‘किंग कोहली का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’, #WorldStandsWithKohli ट्रेंडिंगमध्ये
काल #WorldStandsWithKohli आणि #NationStandsWithDada हे दोन हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंड करत होते. कोहलीच्या हॅशटॅगवर मोठ्या प्रमाणात टि्वटस करत पाठिंबा देण्यात आला.
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (Bcci) सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्या वादाचे पडसाद सोशल मीडियावर (Social media) उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावरुन कोहलीला (Virat kohli) मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. इन्स्टाग्राम, टि्वटरवरील कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या हे सुद्धा कोहलीच्या वाढत्या पाठिंब्यामागचं एक मुख्य कारण आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे खुलासे केले, तेव्हापासून बीसीसीआय विरुद्ध कोहली असा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आधी विराट विरुद्ध रोहित असा वाद दिसत होता. पण आता दादा म्हणजे सौरव गांगुली विरुद्ध कोहली असा सामना रंगला आहे. विराट पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीचे दावे खोडून काढले. बोर्डाने कर्णधार पदाबद्दल निर्णय घेण्याआधी चर्चा केल्याचा गांगुलीचा दावा विराटने फेटाळून लावला तसचं गांगुलीने आपल्याला टी-20 कर्णधारपदी कायम राहण्याची कुठलीही विनंती केली नव्हती हे सुद्धा स्पष्ट केलं.
#WorldStandsWithKohli King kohli ka apman Nahi sahega hindustan ?? pic.twitter.com/it4t0fXiMw
— jeet yaduvanshi (@JITENDR97530993) December 17, 2021
He could have easily skipped those questions or could have taken Ganguly’s side but he chose to stay honest and speak for what’s right. Man is as honest as it gets. ❤#WorldStandsWithKohli pic.twitter.com/MrdLVFrv6q
— Harsh // Parody (@ForeverVirat_) December 17, 2021
विराटच्या या खुलाशानंतर जेव्हा गांगुलीला माध्यमांनी गाठलं व या बद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्याने “मला या बद्दल काही बोलायचे नाही. आम्ही हा विषय हाताळू, बीसीसीआयवर सोडून द्या” असे गांगुली म्हणाला. गांगुलीच्या या वक्तव्याची टि्वटरवर नेटीझन्सनी गंभीर दखल घेतली आहे. एक गट सौरव गांगुलीसोबत उभा राहिल्याचं दिसत आहे, तर दुसरा गट विराटच्या पाठिशी आहे. ते भक्कमपणे विराटच्या पाठिशी उभे आहेत. काल #WorldStandsWithKohli आणि #NationStandsWithDada हे दोन हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंड करत होते. कोहलीच्या हॅशटॅगवर मोठ्या प्रमाणात टि्वटस करत पाठिंबा देण्यात आला.
Greatest Ever Test Captain pic.twitter.com/F0vhYk7zl2
— KING KOHLI (@Abhishe28381948) December 17, 2021
Few hates him but tons of people loves him.#WorldStandsWithKohli pic.twitter.com/kLmp2P1rOU
— SHOUNAK?? (@Shounak_72_) December 17, 2021
A Lion Doesn’t Concern Himself With The Opinion of a Sheep..!!?
And the world knows who’s the Lion King…!!❣ @imVkohli ❣#WorldStandsWithKohli pic.twitter.com/3CtjNoypv2
— Saurabh Tripathi (@SaurabhTripathS) December 17, 2021
संबंधित बातम्या: Eknath Shinde : बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध, कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा NH48 | दिल्ली अब बहुत दूर नही ! मुंबई दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना Nashik| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतीतील 11 OBC राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात; 19 जानेवारीला होणार मतमोजणी