love Story:’तुझं लग्न ठरलं आहे’, आईनं फोनवर सांगताच सुरेश रैनाच्या पायाखालची वाळू सरकली, पण झालं असं की…

Love Story: सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी यांची प्रेम कहाणी इतर खेळाडूंच्या तुलनेत काहीशी वेगळी आहे. लग्न अरेंज की लव्ह याबाबत अजूनही संभ्रम आहे. आईच्या एका फोन कॉलमुळे सर्वकाही ठरलं.

love Story:'तुझं लग्न ठरलं आहे', आईनं फोनवर सांगताच सुरेश रैनाच्या पायाखालची वाळू सरकली, पण झालं असं की...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सुरेश रैनाला आईनं फोन करून सांगितलं की, तुझं लग्न ठरलं आणि...
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 5:54 PM

मुंबई- देशात क्रिकेट म्हंटलं की भारतीयांचा जीव की प्राण… तासंतास टीव्ही शोरूमबाहेर सामने पाहताना आपण लोकांना पाहिलं आहे. यावरून क्रिकेटबाबतचं वेड आणि प्रेम दिसून येतं.चाहत्यांमध्ये क्रिकेटप्रमाणेच क्रिकेटपटूंची प्रेम कहाणी चर्चेचा विषय असतो. आज आपण सुरेश रैनाच्या प्रेम कहाणीबाबत जाणून घेणार आहोत. सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती घेतली. मिस्टर आयपीएल म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाची प्रेम कहाणी काही वेगळी नाही.सुरेश रैनानं आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी हे दोघं 3 एप्रिल 2015 या दिवशी लग्नबंधनात अडकले. पण सुरेश रैना आणि प्रियंका चौधरीचं प्रेम जुळलं तरी कसं? याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. चला तर मग या दोघांच्या प्रेमकथेचा उलगडा करूया.

सुरेश रैनाच्या पत्नीनं गाझियाबाद अभियांत्रिकी कॉलेजमधून बी. टेक केलं आहे.लग्नापूर्वी प्रियंका आयटी प्रोफेशनल म्हणून नेदरलँड बँकेत काम करत होती. आता प्रियंका एका नामांकित हेल्थकेअर ब्रँडची को फाउंडर आहे. तिने आपल्या कतृत्वाने वेगळी अशी छाप निर्माण आहे. त्याचबरोबर एक पत्नी आणि आईची भूमिकाही व्यवस्थितरित्या पार पाडत आहे.सुरेश रैना आणि प्रियंका एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते. पण कहाणीमध्ये ट्विस्ट असा आला की, दोघांची मैत्री फुलत असताना प्रियंका चौधरी तिच्या कुटुंबासोबत पंजाबला शिफ्ट झाली. त्यामुळे दोघांचा संवाद काही काळासाठी तुटला होता. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैनानं याबाबत खुलासा केला आहे.

सुरेश रैना आणि प्रियंकाची ओळख कशी?

“मी प्रियंकाला लहानपणापासून ओळखत होतो. पण मधल्या काळात आमचा संवादच झाला नाही. मला आठवतं की, मी तिला 2008 मध्ये एअरपोर्टवर फक्त पाच मिनिटांसाठी भेटलो होतो. ती हॉलंडला चालली होती आणि मी आयपीएल खेळण्यासाठी बंगळुरुला जात होतो. आम्ही फक्त पाच मिनिटांसाठी दिल्ली एअरपोर्टवर भेटलो होतो.” असं सुरेश रैनानं सांगितलं. प्रियंकाशी प्रेमविवाह केला की, घरच्यांनी ठरवलं हा प्रश्न विचारताच त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “प्रियंकाचे वडील गाझियाबादमध्ये माझे स्पोर्ट शिक्षक होते. तिची आई आणि माझी आई चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. म्हणून मी हे कुटुंबाने ठरवलेलं लग्न आहे असंच म्हणेन. कारण आमचं कुटुंब एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होतं.” पण नेमकं लग्न झालं कसं या प्रश्नावर त्याने दिलखुलासपणे उत्तर दिलं.

सुरेश रैना आणि प्रियंकाचं लग्न कसं ठरलं

“मी ऑस्ट्रेलियात पाच महिने होते तेव्हा आईने सर्वकाही ठरवलं होतं. मला याबाबत काहीच माहित नव्हतं. आईनं एक दिवस कॉल केला आणि म्हणाली मी तुझं लग्न तुझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत ठरवलं आहे. मी विचारलं कोण आहे ती. तेव्हा तिने सांगितलं प्रियंका..”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.