Rishabh Pant ला भेटण्यासाठी पोहोचले टीम इंडियातील त्याचे तीन मित्र, फोटो पाहून फॅन्स झाले खूश

Rishabh Pant च्या रिकव्हरीबद्दलही महत्वाची अपडेट. पंतला या कठीण काळात आपल्या जवळच्या माणसांची साथ मिळतेय. ऋषभ पंत लगेच मिसळून जातो. आता हळूहळू त्याच्या अडचणी कमी होतायत.

Rishabh Pant ला भेटण्यासाठी पोहोचले टीम इंडियातील त्याचे तीन मित्र, फोटो पाहून फॅन्स झाले खूश
Rishabh pantImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:00 AM

Rishabh pant Recovery update : टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन ऋषभ पंतसाठी सध्याचा काळ कठीण आहे. आता हळूहळू त्याच्या अडचणी कमी होतायत. क्रिकेटच्या मैदानापासून लांब ऋषभ रुग्णालयाच्या बेडवर होता. दोन पावलं चालण्यासाठी सुद्धा त्याला आधाराची गरज भासत होती. पंतला या कठीण काळात आपल्या जवळच्या माणसांची साथ मिळतेय. ऋषभ पंत लगेच मिसळून जातो. त्यामुळे फक्त सहकारी खेळाडूच नाही, तर माजी खेळाडूंसोबतही त्याचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

ऋषभ पंतचा अपघात झाला, तेव्हा बीसीसीआय सोबतच सुरेश रैना, शिखर धवन सगळेच त्याच्या प्रकृतीची अपडेट घेत होते. आता रिकव्हरीच्या प्रोसेसमध्येही ऋषभ पंतला मित्रांची साथ मिळतेय.

पंतसोबत ते तिघे

अलीकडेच सुरेश रैना, हरभजन सिंग आणि एस श्रीसंतने ऋषभ पंतची भेट घेतली. रैना आणि श्रीसंतने फोटो शेअर केलाय, ज्यात पंतचा दुखापतग्रस्त पाय दिसतोय. या फोटोत पंतच्या चेहऱ्यावर हास्य आहे. त्याच्यासोबत हरभजन सिंग, सुरेश रैना आणि श्रीसंत हसताना दिसतायत. फॅन्सना हा फोटो भरपूर आवडलाय. पंत लवकरच रिकव्हरी करेल, हा विश्वास आहे.

श्रीसंतने काय लिहिलय?

श्रीसंतने फोटो शेअर करताना, पंतला मी माझा भाऊ मानतो असं त्याने लिहिलं आहे. पंत बद्दल जिव्हाळा व्यक्त करताना श्रीसंतने त्याला स्वत:वर विश्वास ठेवायला सांगितला आहे. मी आणि पंत एकसारखेच आहोत. आमचा प्रेमाच्या भाषेवर विश्वास आहे. आयुष्य एकदाच मिळतं, त्यात भावाच प्रेम महत्वाच आहे, असं श्रीसंतने लिहिलय.

तो पुन्हा भरारी घेईल

सुरेश रैनाने सुद्ध फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये भावांच प्रेम सर्वकाही आहे, असं लिहिलय. पंत लवकर बरा होईल, तो पुन्हा भरारी घेईल असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केलाय.

कधी झाला अपघात?

मागच्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. आईला भेटण्यासाठी पंत डेहराडूनला चालला होता. त्यावेळी एक्स्प्रेस वे त्याची कार धडकून पलटी झाली होती. सुदैवाने पंत या अपघातातून बचावला. तो कारच्या बाहेर निघाल्यानंतर कारने पेट घेतला. त्याच मार्गावरुन जाणाऱ्या एका बस ड्रायव्हरने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. ऋषभवर डेहराडूनच्या खासगी रुग्णालयात सुरुवातीला उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मुंबईत डॉक्टरांनी ऋषभच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता तो रिकव्हरीच्या प्रोसेसमध्ये आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.