Suresh Raina : ‘मी म्हणजे शाहीद आफ्रिदी नाही’, टोमणा मारुन सुरेश रैना असं का म्हणाला? VIDEO
Legends League Cricket : सुरेश रैनाच सरळ उत्तर होतं, तो शाहीद आफ्रिदी नाहीय. अचानक हा प्रश्न कुठून आला? त्याच्या तळाशी जाऊया. सुरेश रैनाला असं सांगण्याची वेळ का आली?
Legends League Cricket : सुरेश रैना चर्चेत आहे. IPL मध्ये पुनरागमनाबद्दल त्याने एक वक्तव्य केलय. सुरेश रैना सध्या लेजेंडस लीग क्रिकेटमध्ये खेळतोय. सुरेश रैनाला IPL पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारण्यात आल, त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच खळखळून हसू आलं. सुरेश रैनाच सरळ उत्तर होतं, तो शाहीद आफ्रिदी नाहीय. अचानक हा प्रश्न कुठून आला? त्याच्या तळाशी जाऊया. वर्ल्ड जायंट्स टीम विरुद्ध सुरेश रैनाने चांगली बॅटिंग केली.
इंडियन महाराजाची टीम ही मॅच हरली. पण सुरेश रैनाने सामन्यात आपला प्रभाव दाखवून दिला.
3 सिक्स, 2 फोर
डावखुऱ्या सुरेश रैनाच जायंट्स विरुद्ध अर्धशतक फक्त 1 रन्सने हुकलं. त्याने 41 चेंडूत 49 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 2 चौकार होते. या इनिंगमुळे इंडियन महाराजाला मॅच जिंकता आली नाही. पण त्याची बॅटिंग पाहून रैना IPL मध्ये पुनरागमन करणार का? हा प्रश्न निर्माण झाला.
IPL मध्ये पुनरागमन करणार?
लेजेंड्स लीगमध्ये वर्ल्ड जायंट्स विरुद्ध सुरेश रैनाची 49 रन्सची खेळी पाहिल्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात आला. IPL मध्ये पुनरागमन करणार ?. त्यावर सुरेश रैनाने मस्करीच्या अंदाजात उत्तर दिलं.
Suresh Raina !!!pic.twitter.com/Ez6x5gLKtN
— Drink Cricket ? (@Abdullah__Neaz) March 15, 2023
काय उत्तर दिलं रैनाने?
“मी रिटायरमेंट नंतर परत यायला शाहीद आफ्रिदी नाही. मी सुरेश रैना आहे” शाहिद आफ्रिदीची त्याने फिरकी घेतली. रैनाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. LLC च्या 4 मॅचमध्ये रैनाने किती धावा केल्या ?
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या चालू सीजनमध्ये सुरेश रैना अजूनपर्यंत 4 सामने खेळलाय. यात त्याने 71 धावा केल्या आहेत. यात वर्ल्ड जायंट्स विरुद्ध सर्वाधिक 49 धावा केल्या. लीगमध्ये रैनाने आतापर्यंत 7 फोर सिक्स मारल्या आहेत. इंडियन महाराजाकडून सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.