Suresh Raina’s Father Passes Away: सुरेश रैनाच्या वडिलांच निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

त्रिलोकचंद रैना हे लष्करी अधिकारी होते. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बॉम्ब बनवण्यात ते माहीर होते.

Suresh Raina's Father Passes Away: सुरेश रैनाच्या वडिलांच निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी
suresh raina family photo Twitter
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 3:40 PM

गाझियाबाद: भारताचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या (Suresh Raina) वडिलांचं आज निधन झालं. सुरेश रैनाचे वडिल त्रिलोकचंद रैना (Trilokchand Raina) यांना कॅन्सरचा आजार झाला होता. त्रिलोकचंद रैना हे लष्करी अधिकारी होते. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बॉम्ब बनवण्यात ते माहीर होते. गाझियाबाद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश रैना काश्मिरी पंडित आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ‘रैनावारी’ हे त्यांचं मूळगाव आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरु होता. अनेक काश्मिरी पंडितांची (Kashmiri pandit) हत्या केली जात होती. त्यावेळी त्रिलोकचंद रैना यांनी आपलं गाव सोडलं. मुरादनगर येथे रैनाचं कुटुंब स्थायिक झालं.

सुरेश रैनाच्या वडिलांना 10 हजार रुपये पगार होता. सुरेशसाठी क्रिकेट कोचिंगचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. 1998 साली लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोटर्स कॉलेजमध्ये रैनाने प्रवेश घेतला. त्यानंतर क्रिकेटसाठी खर्चाची अडचण दूर झाली. निधन झालेल्या सैनिक कुटुंबाची आपले वडिल कशी काळजी घ्यायचे, ते रैनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांना आर्थिक स्वरुपात मदत करायचे. त्याशिवाय त्या कुटुंबांना त्यांच्या हक्काचं सगळ मिळालं पाहिजे, त्याची काळजी सुद्धा घ्यायचे.

सुरेश रैना भारताचा एक महत्त्वाचा खेळाडू होता. या डावखुऱ्या फलंदाजाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैनाने 18 कसोटी सामन्यात 768 धावा केल्या आहेत. रैना भारताकडून 226 एकदिवसीय सामने खेळला. यामध्ये त्याने 5615 धावा केल्या. यात पाच शतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने 78 टी-20 सामन्यात 1604 धावा केल्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.