सूर्यकुमार यादवला बोल्ड करणारी ‘ती’ 19 वर्षांची मुलगी कोण ?
सूर्यकुमार यादवला भले थोडी उशिराने टीम इंडियामध्ये संधी मिळाली. पण तो आज टीमचा मुख्य भाग आहे.
मुंबई: सूर्यकुमार यादवला भले थोडी उशिराने टीम इंडियामध्ये संधी मिळाली. पण तो आज टीमचा मुख्य भाग आहे. वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारने आज कमालीच यश मिळवलय. सूर्याने नेहमीच त्याच्या यशाच श्रेय देविशा शेट्टीला दिलय.
कठीण समयी आशेचा किरण
“वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी एका 20 वर्षाच्या मुलाला अनुभवी, परिपक्व व्यक्तीमत्वामध्ये बदलताना पाहिलय. मी त्यावेळी सुद्धा तुझ्यावर प्रेम करायची. आजही करते. मी तुझी भरपूर आभारी आहे. एक व्यक्ती म्हणून तू माझं आयुष्य आहेस, कठीण समयी आशेचा किरण आहेस, माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम राहिलं” असं देविशा शेट्टीने त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सूर्यापेक्षा तीन वर्षांनी लहान
देविशा सूर्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. सूर्या ज्या कॉलेजमध्ये शिकायचा, तिथेच देविशाने 12 वी नंतर प्रवेश घेतला. सूर्याने देविशाला पहिल्यांदा कॉलेज कार्यक्रमात डान्स करताना पाहिलं होतं. त्याचवेळी त्याचं तिच्यावर प्रेम जडलं. देविशा त्यावेळी फक्त 19 वर्षांची होती. त्याने आपल्या मित्रांना देविशाची माहिती काढायला सांगितली. त्यानंतर मैत्री केली.
त्यांच्या प्रेमविवाहाला मान्यता कशी मिळाली?
हळू-हळू मैत्री प्रेमात बदलली. पाच वर्षानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. सूर्याने त्यावेळी आयपीएलमध्ये ओळख निर्माण केली होती. देविशाच्या कुटुंबियांनी सहज त्यांच्या प्रेमविवाहाला मान्यता दिली. देविशा प्रत्येकवेळी सूख-दुखात सूर्यासोबत उभी राहिली. इन्स्टाग्राम रीलपासून स्टेडियममध्ये सूर्यासाठी चीयर करताना ती दिसते.
देविशाला लकी चार्म मानतो
देविशामुळेच मी टीम इंडियामध्ये आलो, असं सूर्यकुमारने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. फलंदाजीसाठी पर्सनल कोच ठेवण्याचा सल्ला तिनेच सूर्यकुमारला दिला होता. त्यामुळे सूर्याला क्रिकेट आणि आपल्या फिटनेसवर लक्ष देता आलं. रोहित शर्माच्या मते, देविशानेच सूर्यकुमारच्या करीयरला योग्य दिशा दाखवली. तो देविशाला लकी चार्म मानतो.
View this post on Instagram
डान्स स्कूलही चालवायची
सूर्यकुमार रोमँटिक आहे. त्याने छातीवर पत्नीच नाव गोंदवलय. देविशा नेहमीच जवळ असते, ही त्यामागची भावना आहे. देविशा सोशल वर्कर आहे. 2013 ते 2015 एनजीओसाठी तिने काम केलय. त्याआधी ती डान्स स्कूलही चालवायची.