IND vs SL: गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा Suryakumar Yadav चा VIDEO, मुंबईत पॉवर हिटिंगचा ‘शो’ दिसणार?
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 मॅच आधी सूर्यकुमार यादवने नेट्समध्ये काही क्लासिकल फटके दाखवले.
मुंबई: श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीजची सुरुवात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून होणार आहे. ही सीरीज सूर्यकुमार यादवसाठी खूप स्पेशल आहे. कारण त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. सूर्यकुमार यादव या सीरीजमध्ये टीमचा उपकर्णधार आहे. सूर्यकुमार यादव आता अधिक जबाबदारीने खेळून टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये आक्रमक खेळ दाखवण्यासाठी तयारी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवने जोरदार प्रॅक्टिस केली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने अपलोड केलाय.
हे शॉट्स धडकी भरवणारे
सूर्यकुमार यादव या व्हिडिओत नेट्समध्ये बॅटिंग करताना दिसतोय. सूर्यकुमारने या दरम्यान कमालीचे शॉट्स मारले. व्हिडिओमध्ये सूर्यकुमार ड्राइव्ह मारताना दिसतो. त्यानंतर त्याने आपल्याच अंदाजत अजब-गजब शॉट्स मारले. सूर्यकुमार यादवच्या या शॉट्समुळे कुठल्याही गोलंदाजाच्या मनात दहशत निर्माण होऊ शकते. कारण सूर्यकुमार यादव जे फटके खेळतो, त्यासाठी तुम्ही फिल्ड सेट करु शकत नाही.
सूर्यकुमारपासून श्रीलंकेची टीम कशी वाचणार?
श्रीलंकेची टीम टी 20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला तोडीस तोड टक्कर देऊ शकते. त्यांनी आशिया कपच विजेतेपद मिळवलं होतं. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांसाठी सूर्यकुमारला रोखणं कठीण असेल. सूर्यकुमार टी 20 फॉर्मेमधील नंबर 1 फलंदाज आहे. मागच्यावर्षी त्याने या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेटही 180 पेक्षा जास्त आहे. वर्ल्ड क्रिकेटमधील हा सर्वोत्तम स्ट्राइक रेट मानला जातो.
A new year ?️ A new start ?? A new Vice-captain – @surya_14kumar – for the Sri Lanka T20I series ?#TeamIndia had their first practice session here at Wankhede Stadium ahead of the T20I series opener in Mumbai ?️#INDvSL | @mastercardindia pic.twitter.com/qqUifdoDsp
— BCCI (@BCCI) January 2, 2023
श्रीलंकेविरुद्ध सूर्याचा स्ट्राइक रेट किती?
श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव फक्त 2 टी 20 सामने खेळलाय. ज्यात त्याने 84 धावा केल्यात. श्रीलंकेविरुद्ध सूर्याचा स्ट्राइक रेट फक्त 133 चा आहे. फॉर्ममध्ये आहे सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवने मागच्यावर्षी जबरदस्त बॅटिंग केलीच. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेतही तो चांगल्या इनिंग खेळला. हैदराबाद आणि सौराष्ट्राविरुद्ध तो 90 आणि 95 रन्सची इनिंग खेळला. सूर्यकुमार यादवची शतकाची संधी दोनवेळा हुकली.