IND vs ENG: इंग्लंडच्या टीमवर सूर्यकुमारची दहशत, त्यांनी घाबरलं सुद्धा पाहिजे, कारण….

IND vs ENG: सूर्यकुमार यादवने इंग्लंड विरुद्ध असं काय केलय?

IND vs ENG: इंग्लंडच्या टीमवर सूर्यकुमारची दहशत, त्यांनी घाबरलं सुद्धा पाहिजे, कारण....
Suryakumar-YadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 3:12 PM

एडिलेड: सूर्यकुमार यादवने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये कमाल केली आहे. सूर्यकुमार वर्ल्ड कपमध्ये आपल्या आगळ्या-वेगळ्या शॉट्सनी धावांचा पाऊस पाडतोय. आता त्याच्याकडून सेमीफायनलमध्ये चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. गुरुवारी एडिलेडच्या मैदानात टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सामना होईल.

बेन स्टोक्स सूर्यकुमारबद्दल काय म्हणाला?

सूर्यकुमार यादव इंग्लंडसाठी सुद्धा धोकादायक आहे. बेन स्टोक्सच्या विधानावरुन तरी असच वाटतय. बेन स्टोक्सने सेमीफायनल मॅचआधी सूर्यकुमार यादवच भरपूर कौतुक केलं. “सूर्यकुमार यादव एक शानदार खेळाडू आहे. त्याचे शॉट्स पाहून तुम्ही तुमचं डोकं खाजवता. तो कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याला लवकर रोखण्यात आम्ही यशस्वी ठरु अशी अपेक्षा” असं बेन स्टोक्स म्हणाला.

सूर्यकुमारने किती चौकार-षटकार मारले ?

सूर्यकुमार यादवने टी 20 वर्ल्ड कपच्या 5 इनिंग्समध्ये 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 193 पेक्षा जास्त आहे. सूर्यकुमारने 3 अर्धशतक झळकावली आहेत. सूर्यकुमार यादवने या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 33 वेळा चेंडू सीमापार पाठवलाय. यात 25 चौकार आणि 8 षटकार आहेत. सूर्यकुमार यादवच्या या धमाकेदार सरासरी मागचं खर कारण त्याचं गजबच शॉट सिलेक्शन आहे.

सूर्यकुमारच जबरदस्त शॉट सिलेक्शन

सूर्यकुमार यादव या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या दमदार शॉट्सच्या बळावर भरपूर धावा बनवतोय. विकेटच्या पुढे कमी आणि मागे जास्त धावा बनवतोय. त्याच्या शॉट्सवर फिल्डिंग करणं जवळपास अशक्य आहे. सूर्यकुमार यादव विकेटच्या समोरही तितकाच दमदार खेळ दाखवतोय. कव्हर्स, लाँग ऑफ आणि लाँग ऑनवर चांगले फटके मारलेत.

इंग्लंडच्या टीमने सूर्यकुमारला घाबरलच पाहिजे, कारण….

सध्या इंग्लंडच्या टीमलाही सूर्यकुमार यादवची धास्ती आहे. इंग्लंडच्या टीमने सूर्यकुमारला घाबरल सुद्धा पाहिजे. कारण आकडेच तसे आहेत. टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमारने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं. भारताने हा सामना गमावला. पण सूर्यकुमारच्या खेळाने सर्वांच मन जिंकलं. त्याने 55 चेंडूत 117 धावा फटकावल्या होत्या. यात 14 फोर आणि 6 सिक्स होते. म्हणून इंग्लंडच्या टीमवर सूर्यकुमारची दहशत आहे.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.