IND vs AUS Final | प्रश्नांचा भडीमार सुरु, सूर्यकुमार यादवला का खेळवलं?
IND vs AUS Final | आज सूर्यकुमार यादवकडे वेळ होता. शेवटच्या 5-6 ओव्हर राहिलेल्या अशी स्थिती नव्हती. मग अशावेळी सूर्यकुमार यादव का नाही खेळला? टीम इंडियाच्या स्कोरबोर्डवर आणखी 30-40 रन्स हव्या होत्या.
IND vs AUS Final | T20 मधील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव अपेक्षेनुसार प्रदर्शन करु शकला नाही. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत फक्त 18 धावा केल्या. खरंतर आज सूर्यकुमारकडून टीमला भरपूर अपेक्षा होत्या. टीम इंडियाला आज धावांची गरज होती. त्यावेळी सूर्युकमार यादव फक्त 18 रन्स करुन तंबूत परतला. विराट कोहली आणि रोहित शर्माचा अपवाद वगळता टीम इंडियाचे अन्य फलंदाज वेगाने धावा करु शकले नाहीत. केएल राहुलने 107 बॉल घेऊन 66 रन्स केले. त्यात फक्त 1 बाऊंड्री होती.
T20 स्पेशलिस्ट आणि वेगाने धावा बनवण्यासाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार सपशेल अपयशी ठरला. म्हणा आज सूर्यकुमार यादवकडे वेळ होता. शेवटच्या 5-6 ओव्हर राहिलेल्या अशी स्थिती नव्हती. सूर्यकुमार यादवच्या आधी रवींद्र जाडेजाला पाठवलं. तो लवकर आऊट झाला. त्यामुळे सूर्यकुमारकडे 14 ओव्हर होत्या. पण सूर्यकुमारने निराश केलं. त्याने फक्त एक चौकार मारला. संजू सॅमसनच्या जागी सूर्यकुमारला प्राधान्य दिलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमारने एखाद-दुसरा अपवाद वगळता फार प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे वनडेमधील त्याच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह असेल.
Whether India wins today or not, I love to hear the explanation of the reason why #SuryakumarYadav played for this ODI team when far better , consistent inform players were there waiting. Except Indian team think tank, understood he is not good for ODIs #INDvsAUSFinal
— Rahul R (@rahool360) November 19, 2023
सूर्य कुमार यादव ने पूरे विश्वकप में निराश किया है. उनसे जो उम्मीद थी वो वैसा प्रदर्शन नहीं कर सके हैं. जिस तरह वो T20 में प्रदर्शन करते हैं उसका आधा भी अभी तक वन डे में करने में नाकामयाब में रहे हैं. आज अच्छा मौका था यहां भी चलते बने.अभी तक का उनका वन डे करियर अच्छा नहीं रहा है.… pic.twitter.com/KrAuWWM6w4
— Shubham Shukla (@ShubhamShuklaMP) November 19, 2023
‘जिंको किंवा हरो आज उत्तर हवं’
मोठ्या टुर्नामेंटसाठी संघ निवड करताना नेहमीच संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करुन सूर्यकुमार यादवला संधी दिलीय. पण सूर्या वनडे क्रिकेटमध्ये त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये संजू सॅमसनला संधी मिळू शकते. “आज टीम इंडिया जिंको किंवा हरो, सूर्यकुमार यादवला का खेळवलं? याच उत्तर हवय. कारण सूर्यकुमारपेक्षा जास्त क्षमता टॅलेंट असलेले प्लेयर बाहेर बसलेत” एका नेटीझन्सची ही कमेंट आहे.