IND vs ENG: सेमीफायनलमध्ये भारताच्या ‘या’ कमजोरीचा इंग्लंडची टीम उचलू शकते फायदा
IND vs ENG: झिम्बाब्वे विरुद्ध मॅच जिंकली पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करता येणार.
एडिलेड: टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलचा सामना होणार आहे. या टीमची एक कमकुवत बाजू आहे. टीम इंडियाकडे विकेट घेणारे स्पिनर नाहीयत. झिम्बाब्वे विरुद्ध मॅचमध्ये वेगवान गोलंदाजांनी पाच फलंदाजांना 40 पेक्षाही कमी रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
त्यांनी झटपट 50 धावांची भागीदारी केली
पण स्पिनर गोलंदाजीला आल्यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी वेगाने धावा जमवल्या. त्यांनी झटपट 50 धावांची भागीदारी केली. स्पिनर्स संदर्भात रवी शास्त्री मधल्या ओव्हर्समध्ये कॉमेंट्री करताना म्हणाले की, “मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सनी विकेट घेणं गरजेच आहे. दुसऱ्या टीम्सकडे शादाब, नवाज, सेंटनर, सोढी, मोइन अली आणि आदिल राशिद सारखे गोलंदाज आहेत. ते सर्व आपल्या टीम्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावतायत”‘
चहलला संधी कधी देणार?
वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून टीम इंडियाकडून अश्विन आणि अक्षर पटेल या दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिलीय. युजवेंद्र चहलला अजून संधी दिलेली नाही. प्लेइंग 11 मध्ये चहलला संधी न दिल्याबद्दल रवी शास्त्री यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मागच्यावर्षी यूएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्या टीममध्ये चहलची निवड झाली नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यावेळी सिलेक्टर्सनी आपली चूक सुधारली. पण टीम मॅनेजमेंटने अजून चहलला संधी दिली नाही.
अश्विनच काय चुकतय?
“अश्विन जो पर्यंत मध्यमगतीने गोलंदाजी करत राहील, तो पर्यंत त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होत राहतील” असं सुनील गावस्कर म्हणाले. अश्विनने कालच्या मॅचमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी करुन तीन विकेट घेतल्या. भारतासाठी पुढच्या दोन मॅचमध्ये स्पिनर्सनी विकेट घेणं गरजेच आहे.