Suryakumar Yadav: मुंबईतल्या पारसी जिमखान्यामुळे ऑस्ट्रेलियात सूर्यकुमारची तुफान बॅटिंग सुरु, वाचा Inside Story
Suryakumar Yadav: त्यामुळे चालू टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर्या विकेटच्या पुढे नाही, मागे जास्त धावा बनवतोय.
मुंबई: सध्या क्रिकेट विश्वात सूर्यकुमार यादवच्या नावाची चर्चा आहे. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने कमाल केलीय. सध्या सूर्यकुमार यादवला रोखणं कुठल्याही टीमला सहजासहजी शक्य नाहीय. त्याने आपल्या अजब-गजब शॉट्सनी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहेत. सूर्यकुमारने 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 190 च्या पुढे आहे.
ऑस्ट्रेलियन विकेट्सवर इतकी सहज फलंदाजी कशी करतो? चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या बॅट्समनला अशी कामगिरी करुन दाखवणं सोप नाहीय. पण सूर्यकुमारने करुन दाखवलय. आज सूर्यकुमार ऑस्ट्रेलियात जी बॅटिंग करतोय, त्यामागे त्याची मेहनत आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी त्याने कसून सराव केला होता.
टी 20 वर्ल्ड कप 2022 आधी सूर्यकुमार यादवने मुंबईच्या मैदानात स्पेशल ट्रेनिंग केली. सूर्यकुमार यादवने त्या ट्रेनिंगमध्ये असं काय केलं, की ज्यामुळे ऑस्ट्रेलियन विकेट्सवर धावांच्या राशी उभारतोय.
सूर्यकुमारची विशेष गवतावर प्रॅक्टिस
सूर्यकुमार यादवने टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पारसी जिमखान्यावर सराव केला होता. सूर्यकुमार यादवने या मैदानात हिरवीगार खेळपट्टी बनवून घेतली, ज्यावर अतिरिक्त बाऊन्स होता. त्याशिवाय एक साइड आर्म स्पेशलिस्ट गोलंदाजाला बोलावल होतं. एका थ्रो डाऊन स्पेशलिस्ट सोबतही त्याने प्रॅक्टिस केली. सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियन विकेट्सवरील अतिरिक्त बाऊन्समुळे हा निर्णय घेतला होता.
सूर्यकुमारला काय फायदा झाला?
पासरी जिमखान्यावर सूर्याने खास हिरवीगार खेळपट्टी बनवून घेतली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन कंडिशन्सशी जुळवून घ्यायला फार वेळ लागला नाही. त्याने पेस आणि बाऊन्स विरोधात स्कूप शॉट्स खेळण्याची ट्रेनिंग केली. त्यामुळे चालू टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर्या विकेटच्या पुढे नाही, मागे जास्त धावा बनवतोय. सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदांजांच्या वेगाचा उपयोग करुन फटके खेळतोय. स्पिनर्स विरोधात तो स्वीप शॉट्स लगावतोय.
म्हणून सूर्या दुसऱ्या बॅट्समनपेक्षा वेगळा
सूर्यकुमार यादव मॅचमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी करतो, तशीच बॅटिंग तो नेट्समध्येही करतो. सूर्यकुमार नेट्समध्ये आऊट झाल्यावर बॅटिंग करत नाही. आपल्या विकेटची किंमत तो मॅचमध्येच नाही, प्रॅक्टिसच्यावेळी सुद्धा मोठी समजतो. म्हणूनच सूर्या दुसऱ्या बॅट्समनपेक्षा वेगळा ठरतो.