IND vs SL 1st ODI: रोहित शर्माने फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमारला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला का खेळवलं?

IND vs SL 1st ODI: रोहित शर्माने अन्याय केला नाही, उलट न्याय केला, असंच म्हणाव लागेल, कारण....

IND vs SL 1st ODI: रोहित शर्माने फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमारला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला का खेळवलं?
ind vs sl 1st odi suryakumar yadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 1:36 PM

IND vs SL 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वनडे सीरीज सुरु होतेय. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. टॉस झाल्यानंतर टीम जाहीर झाली. त्यात सूर्यकुमार यादवच नाव नव्हतं. त्यामुळे अनेकांना धक्का बसला असेल. दोन दिवसांपूर्वीच राजकोटच्या मैदानात सूर्याने तुफानी शतक ठोकून टीम इंडियाला टी 20 सीरीज जिंकून दिली होती. मग अशा प्लेयरला बाहेर का बसवलं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.

रोहितच्या निर्णयामागे हे कारण

कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला प्राधान्य देण्यामागे एक कारण आहे. ते आहे, वनडे फॉर्मेटमधील दोघांची कामगिरी. सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये सध्याच्या घडीचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो खोऱ्याने धावा करतोय. पण वनडेमध्ये त्याची कामगिरी तशी नाहीय. उलट सूर्यकुमार यादवपेक्षा श्रेयस अय्यर चांगला खेळलाय.

श्रेयस अय्यरने वनडेमध्ये दाखवला दम

रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं असतं, तर कुठे ना कुठे श्रेयस अय्यरवर तो अन्याय ठरला असता. श्रेयस अय्यरने मागच्यावर्षी वनडे फॉर्मेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 15 मॅचेसमध्ये 55.69 च्या सरासरीने 724 धावा फटकावल्या. अय्यरने एक शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली. अय्यरने आपलं बेस्ट प्रदर्शन केलय. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं चुकीच ठरलं असतं.

सूर्यकुमारची कामगिरी कशी आहे?

दुसरीकडे वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार यादवच प्रदर्शन खराब आहे. त्याने वर्ष 2022 मध्ये वनडेमध्ये 26 च्या सरासरीने 260 धावा केल्यात. सूर्यकुमारने फक्त एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. फक्त तो टी 20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता रोहित शर्मा कोणाला संधी देतो, ते लवकरच समजेल. स्पर्धेमागे हे कारण

सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा यासाठी आहे, कारण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीममध्ये पुनरागमन केलय. या तिघाचं खेळणं निश्चित आहे. शुभमन गिलला संधी देणार असल्याच रोहितने आधीच स्पष्ट केलय. तुमचे 4 बॅट्समन सेट आहेत. मग पाचव्या नंबरवर कोण येणार?. पाचव्या नंबरसाठी सूर्यकुमार आणि अय्यरमध्ये स्पर्धा होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.