T20 WC: वर्ल्ड कपसाठी निघण्याआधी Suryakumar Yadav चा पत्नी देविशासोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
काय आहे या व्हिडिओमध्ये? दोघांची रोमँटिक केमिस्ट्री या व्हिडिओत दिसतेय
मुंबई: सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टीम इंडियाचा (Team india) स्टार फलंदाज म्हणून सगळेच ओळखतात. पण तो तितकाच रोमँटिक नवरा सुद्धा आहे. सूर्याने नेहमीच त्याच्या यशाचं श्रेय पत्नी देविशा शेट्टीला (devisha shetty) दिलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओमधून त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. सूर्यकुमारचा आता एक रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात वर्ल्ड कपसाठी निघणाऱ्या सूर्याला देविशा तयार करताना दिसतेय.
सूर्यकुमार-देविशाचा रोमँटिक व्हिडियो व्हायरल
मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेयर केलाय. यात सूर्यकुमार टी 20 वर्ल्ड कपसाठी रवाना होताना दिसतो. देविशाने सूर्यकुमारला कोट घालण्यासाठी मदत केली. दोघांमधील प्रेम आणि रोमान्स व्हिडिओत स्पष्टपणे दिसतो. सूर्याचं संपूर्ण कुटुंब त्यावेळी तिथे उपस्थित होतं. ते सगळेच सूर्याच्या यशावर आनंदी होते. सूर्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये देविशा त्याच्यासोबत होती.
View this post on Instagram
सूर्यकुमारच्या करीयरमध्ये देविशाचा महत्त्वाचा रोल
सूर्यकुमार आणि देविशाची ओळख कॉलेजच्या दिवसांमध्ये झाली होती. तिथेच त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. काही वर्ष सूर्यकुमार आणि देविशाने एकमेकांना डेट केलं. 29 मे 2016 मध्ये साखरपुडा केला. सात जुलै 2016 साली दोघे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले.
सूर्यकुमारच आयुष्य आणि करीयरमध्ये देविशाचा महत्त्वाचा रोल आहे. लग्नानंतर देविशाने त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं, असं सूर्याने सांगितलं होतं. तिने सूर्याच्या कोचिंगपासून डाएटमध्ये महत्त्वाचे बदल केले. त्याचाच परिणाम सूर्याच्या प्रदर्शनात दिसून आला.