AUS vs IND Video: क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच पहिलाच नाही, अक्षर पटेलचा जबरदस्त कॅच सामन्याचा टर्निंग पॉइंट
Axar Patel Catch of the Tournament: अक्षर पटेल याने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने कॅच ऑफ द टुर्नामेंट प्रतिक्रिया दिली आहे. दुसरा युजर म्हणतो कॅच पहिल्यानंतरही मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही.
Axar Patel Catch of the Tournament: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यफेरीत धडक मारली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेले 206 धावांचे आव्हान पेलता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ 7 विकेट्स गमावून 181 धावाच करु शकला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. या सामन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय अक्षर पटेल याने घेतलेला जबरदस्त झेल आहे. त्याचा त्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेट प्रेमींनी त्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे. क्रिकेटचा इतिहासात असा झेल पाहिला नाही, असे काही जणांनी म्हटले आहे.
अक्षर याने असा घेतला झेल
कुलदीप यादव याचा 8.6 षटकांत अक्षर पटेल याने जबरदस्त झेल घेतला आहे. यादव गोलंदाजी करत असताना फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श होता. त्याचाच जबरदस्त झेल अक्षर पटेल याने सीमारेषेवर घेतला. याआधी मार्शला दोनदा जीवनदान मिळाले होते. परंतु अक्षरने त्याला त्याचा फायदा मिळू दिला नाही.
Catch of the tournament by Akshar Patel 🤯 pic.twitter.com/Dmzn9iqdpB
— Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) June 24, 2024
मार्शने कुलदीपचा चेंडू हवेत उडविण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत वेगाने सीमारेषेबाहेर जात होता. अक्षर पटेल याने जबरदस्त झेप घेतली आणि सीमारेषेपार जाणारा चेंडू एका हाताने पकडला. क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम झेल होता. मिचेल मार्शने 28 चेंडूत 37 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. सामन्यात हा झेल टर्निंग पॉईंट ठरला.
I couldn't believe my eyes. It was meant to be six but Take a bow AXAR 🫡🎩#INDvsAUS pic.twitter.com/c2pNKO2POm
— Fatima Ayoubi 🇦🇫🕊 (@FatimaAyoubi005) June 24, 2024
अक्षर याचा झेलचा व्हिडिओ व्हायरल
अक्षर पटेल याने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने कॅच ऑफ द टुर्नामेंट प्रतिक्रिया दिली आहे. दुसरा युजर म्हणतो कॅच पहिल्यानंतरही मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. या कॅचसाठी अक्षर पटेल याला सुर्वणपदक द्यावे, असे आणखी एका युजरने म्हटले आहे.
Give Axar Patel the Gold Medal🏅
This Flying Catch from Axar Patel literally changed the match in favour of Team India 🇮🇳#INDvsAUS pic.twitter.com/c8mx4CXBql
— Richard Kettleborough (@RichKettle07) June 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
This is unbelievable by Axar patel 🔥🔥🔥🔥🔥 . #t20 Ausvsind #kuldeep #rohit #cricket #virat pic.twitter.com/cHU0oSdrsx
— vanarp.crypto (@pjkincrypto) June 24, 2024