राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफमध्ये NCA च्या दिग्गचाची एंट्री, क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार
भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गच क्रिकेटपटू राहुल द्रविडची (Rahul Dravid) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा सपोर्ट स्टाफही लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गच क्रिकेटपटू राहुल द्रविडची (Rahul Dravid) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा सपोर्ट स्टाफही लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) गुरुवारी संघाच्या सपोर्ट स्टाफची घोषणा करू शकतं. (T Dilip can be next fielding coach of indian cricket team)
सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर हे त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपल्या पुढील गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची वाट पाहत आहे. आतापर्यंत रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक म्हणून तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. आता या दोन्ही पदांवर नवीन नावांची भरती होणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टी. दिलीप (T. Dilip) हे टीम इंडियाचे पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. दुसरीकडे, एनसीएचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे (Paras Mhambrey) गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतील. दिलीप काही काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. तो नुकताच श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासोबत होता. दिलीपला अभय शर्माकडून आव्हान मिळत होते आणि तो भारत-अ, अंडर-19 संघासोबत काम करत होता. टीओआयच्या वृत्तानुसार, दिलीपने अभयला पछाडत बाजी मारली आहे आणि तो संघाचा पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनणार आहे.
दोन दिवसांचा ब्रेक मिळेल
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बायो बबलमुळे थकवा आल्याची तक्रार केली होती. याबाबत बीसीसीआय गंभीर असल्याचे दिसत आहे. BCCI ने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी खेळाडूंच्या एकत्र येण्यापूर्वी दोन दिवसांच्या विश्रांतीचा प्रस्ताव दिला आहे. UAE मधील T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आणि सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना BCCI ने घरी जाण्याची ऑफर दिली आहे. खेळाडू बायो बबलमधून कधी बाहेर येईल यावर सगळं अवलंबून हे खेळाडू दोन किंवा तीन दिवसांचा ब्रेक घेऊ शकतात. हा निर्णयही दक्षिण आफ्रिका दौरा डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. जयपूरच्या बायो बबलमध्ये जे खेळाडू असतील त्यांना तीन महिने त्यात राहावे लागेल.
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
टीम इंडियाचे खेळाडू बऱ्याच दिवसांपासून बायो बबलमध्ये आहेत. भारतीय संघ आधी इंग्लंड दौऱ्यावर होता, त्यानंतर खेळाडूंनी IPL-2021 मध्ये भाग घेतला आणि नंतर T-20 विश्वचषक खेळला. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी बायो बबलच्या थकव्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
इतर बातम्या
ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही
(T Dilip can be next fielding coach of indian cricket team)