IND vs PAK : शनिवारी टीम इंडिया पाकिस्तान हायव्हॉल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे पाहता येणार?

India vs Pakistan Asia Cup 2024 : टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी असेलल्या पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या हा सामना कुठे पाहता येणार?

IND vs PAK : शनिवारी टीम इंडिया पाकिस्तान हायव्हॉल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे पाहता येणार?
ind a vs pak a emerging asia cup 2024Image Credit source: acc x account
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:23 PM

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची युवा ब्रिगेड शनिवारी 19 ऑक्टोबरपासून नव्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड कट्टर प्रतिस्पर्धी असेलल्या पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. सध्या ओमानमध्ये एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया ए सह एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एका गटात 4 संघ आहेत. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासोबत या ग्रुपमध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे.

टीम इंडिया ए या मोहिमेची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. तिलक वर्मा टीम इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद हारिस याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना केव्हा?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए यांच्यातील सामना हा शनिवारी 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना कुठे?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना अल अमीरात क्रिकेट ग्राउंड (मिनिस्ट्री टर्फ 1), अल अमीरात येथे खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना भारतात टीव्हीवर कुठेच दाखवण्यात येणार नाही. तर मोबाईलवर फॅनकोडवर पाहता येईल.

इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग, अनुज रावत, हृतिक शोकीन, आर साई किशोर, राहुल चहर, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिक दार सलाम, अंशुल कंबोज, आकीब खान, वैभव अरोरा आणि निशांत सिंधू

पाकिस्तान ए टीम : मोहम्मद हारिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), यासिर खान, अराफत मिन्हास, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज, अब्बास आफ्रिदी, शाहनवाझ दहनी, अहमद दानियाल, मोहम्मद इम्रान आणि जमान खान.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.