T20 WC साठी पाकिस्तानची टीम निवडण्याधी ‘या’ गोलंदाजाची कमाल, थेट घेतली Hattrick

T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने अजूनपर्यंत आपली टीम जाहीर केलेली नाही. पाकिस्तानच्या टीममध्ये कोणाला संधी मिळणार? कोणाला नाही? यावरुन विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

T20 WC साठी पाकिस्तानची टीम निवडण्याधी 'या' गोलंदाजाची कमाल, थेट घेतली Hattrick
Pakistan-cricketImage Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:41 PM

मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने अजूनपर्यंत आपली टीम जाहीर केलेली नाही. पाकिस्तानच्या टीममध्ये कोणाला संधी मिळणार? कोणाला नाही? यावरुन विविध अंदाज वर्तवले जात आहेत. या दरम्यान पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने कमाल केलीय. तो थेट Hattrick घेऊन चर्चेत आलाय. पुढच्या दोन दिवसात पीसीबी वर्ल्ड कपसाठी टीम निवडणार असल्याची माहिती आहे.

3 चेंडूत 3 विकेट

पाकिस्तानातील एका गोलंदाजाने सलग 3 चेंडूत 3 विकेट घेतल्या. देशांतर्गत टी 20 लीगमध्ये या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली. टीम निवडीआधी हॅट्रिक घेणाऱ्या या गोलंदाजाच नाव आसिफ महमूद आहे.

अशी घेतली हॅट्रिक

नॅशनल टी 20 कपमध्ये खेळताना आसिफ महमूदने हॅट्रिक घेतली. आसिफ वेगवान गोलंदाज आहे. त्याने भेदक मारा केला. हॅट्रिक घेताना आसिफने दोन फलंदाजांना क्षेत्ररक्षकांकरवी कॅचआऊट केलं. एकाला क्लीन बोल्ड केलं. आसिफच्या हॅट्रिकच्या बळावर मॅच जिंकली.

3 ओव्हरमध्ये 28 रन्स

खैबर पख्तन्ख्वाह आणि सिंध टीममध्ये हा सामना झाला. आसिफ सिंध टीमचा भाग होता. खैबर पख्तन्ख्वाहने प्रथम फलंदाजी केली. 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 147 धावा केल्या. आसिफ महमूदच्या हॅट्रिकमुळे खैबरची टीम 150 च्या पुढे जाऊ शकली नाही. असिफने हॅट्रिक घेताना नियाज खान, मोहम्मद सरवर आफ्रिदी आणि मोहम्मद इमरान या तिघांना आऊट केलं. त्याने 3 ओव्हर्समध्ये 28 धावा देऊन तीन विकेट घेतल्या.

विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य

सिंध टीमसमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते. 2 चेंडू राखून त्यांनी हे लक्ष्य पार केलं. हॅट्रिक घेणाऱ्या आसिफ महमूदने बॅटनेही तितकच योगदान दिलं. त्याने 17 चेंडूत नाबाद 28 धावा फटकावल्या.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.