क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, 20 ओव्हरची मॅच फक्त 2 बॉलमध्ये संपली
T20 Match : सध्या T20 क्रिकेट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. टी 20 सामन्यात एका इनिंगमध्ये 120 चेंडू टाकले जातात. पण विचार करा, एखाद्या मॅचमध्ये 2 चेंडूत मॅच संपली तर?
T20 Match : सध्या T20 क्रिकेट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. टी 20 सामन्यात एका इनिंगमध्ये 120 चेंडू टाकले जातात. पण विचार करा, एखाद्या मॅचमध्ये 2 चेंडूत मॅच संपली तर? स्पेन आणि Isle of man मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. 26 फेब्रुवारीला दोन्ही टीम्स आमने-सामने होत्या. या मॅचमध्ये जे घडलं, त्याची इतिहासाच्या पानात नोंद झालीय. या मॅचमध्ये T20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली.
या मॅचमध्ये Isle of man ने पहिली बॅटिंग केली. स्पेनच्या 2 बॉलर्सनी या मॅचमध्ये कमालीची बॉलिंग केली. Isle of man च्या टीमने कशीबशी दुहेरी धावसंख्या गाठली. Isle of man ने इतक्या कमी धावा केल्या की, स्पेनच्या टीमने खूप सहजतेने या धावा चेस केल्या.
किती रन्सवर ऑलआऊट झाली टीम
Isle of man पहिली बॅटिंग करताना फक्त 10 धावा केल्या. 20 ओव्हर्सची मॅच होती. पण त्यांची टीम 9 ओव्हरही बॅटिंग करु शकली नाही. फक्त 8.4 ओव्हर्समध्ये Isle of man टीमचा खेळ संपला. स्पेनच्या 3 बॉलर्सनी मिळून Isle of man ची वाट लावली. 4-4 विकेट काढणाऱ्या दोन बॉलर्सचा रोल महत्त्वाचा होता.
72 दिवसात मोडला T20 मधील कमी धावांचा रेकॉर्ड
Isle of man ने ज्या 10 धावा केल्या, त्या T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावा आहेत. 72 दिवसांपूर्वीचा T20 क्रिकेटमध्ये बनलेला सर्वात कमी धावसंख्येचा रेकॉर्डही मोडला. याआधी 16 डिसेंबर 2022 रोजी बिग बॅश लीगमध्ये थंडर्सची टीम स्ट्रायकर्स विरुद्ध 15 रन्सवर ऑलआऊट झाली होती. 2 चेंडूत अशी संपवली मॅच
स्पेनसमोर आता विजयासाठी 20 ओव्हर्समध्ये 11 धावांच टार्गेट होतं. इतकं सोपं लक्ष्य होतं, मॅचचा शेवटही तसाच झाला. स्पेनचा ओपनर आणि विकेटकीपर बॅट्समन अवैस अहमदने 2 सिक्स मारुन मॅच संपवली. स्पेनने 10 विकेट आणि 118 चेंडू राखून मॅच जिंकली.