T20 WC : हार्दिक पंड्याला टीम इंडियातून वगळल्यास कोणाला मिळणार संधी? ‘हे’ दोन खेळाडू रेसमध्ये
या महिन्याच्या 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीला हवे असल्यास ते संघात बदल करू शकतात.
मुंबई : या महिन्याच्या 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीला हवे असल्यास ते संघात बदल करू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे चार दिवस आहेत. आयसीसीकडे विश्वचषकासाठी संघ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडेच IPL-2021 मध्ये खेळून मोकळे झाले आहेत, तर काही अजूनही खेळत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नावाची मोठी चर्चा आहे कारण त्याने गोलंदाजी न करणे हा चिंतेचा विषय आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्ते पंड्याबाबाबत अद्याप विचारात आहेत आणि तो गोलंदाज म्हणून संघात राहील की नाही याचा विचार करत आहेत. तसेच संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा विचार केला जात आहे. (T20 WC: Who will get chance if Hardik Pandya dropped from Team India? Shardul Thakur, Deepak chahar in race)
वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंड्याबाबत पुढील काही दिवसात निर्णय होऊ शकतो. निवडकर्त्यांनी फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे, कारण पंड्या फिट असेल तर तो त्याच्या कोट्यातून चार षटके गोलंदाजी करू शकेल असा विश्वास होता. त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही, तसेच तो फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही.
संघात बदल केले जाऊ शकतात
असे म्हटले जात होते की, अंतिम संघ देण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर होती परंतु ती फक्त त्याच संघांसाठी होती जे 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीत खेळतील. टीओआयने आयसीसीच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “संघ त्यांचा सपोर्ट पीरियड सुरू होण्याच्या सात दिवस आधीपर्यंत संघात बदल करू शकतात. भारताचा सपोर्ट पीरियड सुपर -12 टप्प्यापासून सुरू होत आहे, म्हणजेच 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यामुळे बीसीसीआयकडे संघ बदलण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे.
निवड समितीला काय वाटतं
वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्त्यांना पंड्याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगायची आहे. संपूर्ण विश्वचषकात गोलंदाजी करण्यासाठी पंड्या पूर्णपणे फिट आहे याविषयी पूर्ण स्पष्टता हवी आहे. पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पंड्याने या संपूर्ण आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांची स्टँड बाय म्हणून निवड झाली आहे. गरज असल्यास, यापैकी एकाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सूत्राने सांगितले की, “पंड्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला वगळले जाईल असे ठरवण्यात आले नाही, पण अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे कमी वेळ आहे. ठाकूर आणि दीपक संघात आल्यास, निवडकर्ते हर्षल पटेलला यूएईमध्ये राहण्यास सांगू शकतात.”
इतर बातम्या
The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश
DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!
(T20 WC: Who will get chance if Hardik Pandya dropped from Team India? Shardul Thakur, Deepak chahar in race)