Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: केवळ 38 चेंडूत ऑस्ट्रेलियाने संपवला सामना, बांग्लादेशला मात देत सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल

ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रीकेच्या पुढे पोहोचण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. त्यानुसार त्यांनी बांग्लादेशला 8 विकेट्सनी मात देत हे काम केलं आहे.

T20 World Cup 2021: केवळ 38 चेंडूत ऑस्ट्रेलियाने संपवला सामना, बांग्लादेशला मात देत सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल
ऑस्ट्रेलिया संघ
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 6:51 PM

T20 Cricket World Cup 2021: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत बांग्लादेशला अवघ्या 38 चेंडूत नमवत दणदणीत विजय मिळवला आहे. ऑसीसकडून अॅडम झाम्पाने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्यामुळे बांग्लादेशचा संघ केवळ 73 धावाचं करु शकला. जो स्कोर ऑसीसीने 38 चेंडूत 2 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत 8 विकेट्सनी मोठा विजय मिळवला.

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीची शर्यत आहे. त्यामुळे  ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रीकेच्या पुढे पोहोचण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. त्यानुसार त्यांनी बांग्लादेशला 8 विकेट्सनी मात देत हे काम केलं आहे. आता ते गुणतालिकेत इंग्लंडच्या खालोखाल आहेत. त्यामुळे त्यांच सेमीफायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे.

सामन्याचा लेखाजोखा

सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार त्यांनी केला. त्याप्रमाणे झाम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीने त्यांनी बांग्लादेशला 73 धावांत रोखलं. झाम्पाने 5, हेझलवुड आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 2 तर मॅक्सवेलने 1 विकेट मिळवली.  त्यानंतर अवघ्या 74 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार आरॉन फिंचने दमदार 40 धावा ठोकल्या. वॉर्नरने 18 धावांची तर मिचेल मार्शने नाबाद 16 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 6.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

(T20 World Cup 2021 Australia beat Bangladesh with 8 wickets in hands)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.