नवऱ्याला म्हातारा आणि स्लो बोलणाऱ्यांना डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने फटकारले, म्हणाली…

गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळण्यात यावं, अशी मागणी होत होती. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरदेखील वॉर्नरबाबत सांशक होते, मात्र वॉर्नरने उत्कृष्ट खेळ करत त्याची संघातील निवड सार्थ ठरवली.

नवऱ्याला म्हातारा आणि स्लो बोलणाऱ्यांना डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने फटकारले, म्हणाली...
Candice Warner and David Warner
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:46 PM

मुंबई : डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) मागील गेले काही महिने खूप चढ-उतारांचे होते. एक महिन्यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये, सनरायझर्स हैदराबादने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आणि हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले. पण 14 नोव्हेंबरला त्याच डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक जिंकून दिला. तसेच तो या स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (मालिकावीर) ठरला. यानंतर त्याची पत्नी कँडिस वॉर्नरने टीकाकारांना फटकारलं आहे. ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावल्यानंतर तिने ट्विट करून संताप व्यक्त केला. डेव्हिड वॉर्नरला आउट ऑफ फॉर्म म्हणणाऱ्यांवर कँडिसने निशाणा साधला. (T20 World Cup 2021: Candice Warner silences critics after husband David Warner become player of the tournament)

कॅंडिसने T20 विश्वचषक 2021 च्या फायनलमधील डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक फटकावल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘आऊट ऑफ फॉर्म!!’ यासोबतच तिने ‘आश्चर्यकारक दुःख’ आणि हसणाऱ्या इमोजीदेखील पोस्ट केल्या. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बनल्याचा फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, ‘आउट ऑफ फॉर्म, म्हातारा आणि स्लो (धिमा)! डेव्हिड वॉर्नरचे अभिनंदन.’

गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळण्यात यावं, अशी मागणी होत होती. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरदेखील वॉर्नरबाबत सांशक होते, मात्र वॉर्नरने उत्कृष्ट खेळ करत त्याची संघातील निवड सार्थ ठरवली. डेव्हिड वॉर्नरने T20 विश्वचषक स्पर्धेत 289 धावा फटकावल्या आणि या खेळामुळे त्याची टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू (मालिकावीर) म्हणून निवड झाली. अंतिम सामन्यात 38 चेंडूत 53 धावांची अप्रतिम खेळी खेळणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने 7 सामन्यात 48.16 च्या सरासरीने आणि 146.70 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

आयपीएलमधल्या अपमानाचा बदला?

ज्या खेळाडूची क्षमता आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादला कधीच समजली नाही, तोच खेळाडू टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. खराब फॉर्ममधून जाणाऱ्या वॉर्नरच्या क्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्या सर्वांना वॉर्नरने आपल्या शानदार फलंदाजीने उत्तर दिले आहे.

वॉर्नर फलंदाज म्हणून आयपीएल 2021 मध्ये अपयशी ठरला, त्यामुळे संघव्यवस्थापनाने आधी त्याला कर्णधारपदावरुन हटवले. त्यानंतर त्याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर संघ व्यवस्थापनाने त्याला हॉटेलमध्येच थांबण्यास भाग पाडले. त्याला खेळाडूंच्या डगआऊटमध्येदेखील येऊ दिले नाही. संघाच्या शेवटच्या सामन्यांदरम्यान डेव्हिड वॉर्नर मैदानातही दिसला नाही, तो हॉटेलमधूनच सामना पाहात होता. नंतर शेवटच्या सामन्यात तो स्टेडियममध्ये परतला तेव्हा डगआऊटपासून दूर व्हीआयपी स्टँडमध्ये उभा राहून त्याने सामन्याचा आनंद घेतला. डेव्हिड वॉर्नरने त्याच अपमानाचा बदला घेतल्याचे त्याचे चाहते बोलू लागले आहेत.

इतर बातम्या

Video: कांगारुंची तऱ्हाच न्यारी, विश्वविजेते झाले आणि चक्क बुटात पेय टाकून प्यायले, फुल्ल टू सेलिब्रेशन

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

(T20 World Cup 2021: Candice Warner silences critics after husband David Warner become player of the tournament)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.