T20 World Cup 2021: श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे मॉर्गनने तोडला धोनीचा रेकॉर्ड, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल
इंग्लंडने स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवत श्रीलंका संघाला मात दिली आहे. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्येही जागा निश्चित केली आहे.
T20 Cricket World Cup 2021: इंग्लंड क्रिकेट संघाने यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. त्यांनी श्रीलंका संघाला मात देत स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने (Joss Butller) दमदार शतक ठोकत हा विजय पक्का केला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवलीच आहे. शिवाय त्यांचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा सर्वाधिक टी20 सामन्यांमध्ये विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) याला मागे टाकलं आहे.
श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या. ज्या करताना श्रीलंकेचे सर्व गडी 137 धावांवरच सर्वबाद झाले. ज्यामुळे 26 धावांनी श्रीलंकेचा संघ पराभूत झाला. स्पर्धेत तिसरा पराभव मिळाल्यामुळे श्रीलंकेचं पुढील फेरी पोहचण्याचं स्वप्नही धुळीस मिळालं आहे.
मॉर्गनने तोडला धोनीचा विक्रम
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने हा सामना जिंकत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 68 सामन्यांमध्ये 43 विजय मिळवले आहेत. त्याच्याआधी अफगाणिस्तानच्या असगर अफगाणने 52 मॅचमध्ये 42 आणि एमएस धोनीने 72 मॅचमध्ये 42 विजय मिळवले होते. या यादीत पाकिस्तानचा सरफराज अहमद चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 29 सामने जिंकले आहेत.
असा पार पडला सामना
सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार श्रीलंका संघाने केला. पण या स्वप्नाच्या मध्ये जोस बटलर आला. त्याने 67 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 101 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 40 धावांची साथ दिल्यामुळे इंग्लंडने स्कोरबोर्डवर 163 धावा लावल्या.
164 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. असलंकाने 21, कर्णधार शनाका आणि भानुपक्षा यांनी प्रत्येकी 26 धावा केल्या. तर सर्वाधिक वानिंदू हसरंगाने 34 धावा कुटल्या. पण तोही बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाहीत, 137 धावांवर संघ सर्वबाद झाल्यामुळे श्रीलंका 26 धावांनी पराभूत झाली.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
(T20 World Cup 2021 england beat sri lanka and qualifies for semi final eoin morgan beats dhonis record of most wins as t20 captain)