T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या दोन इच्छा आज पूर्ण झाल्यास वाढदिवसाचं सर्वात मोठं गिफ्ट ठरेल!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 33 वा वाढदिवस आहे. आज त्याच्या दोन इच्छा पूर्ण झाल्यास भारतीय कर्णधाराचा हा वाढदिवस खास ठरू शकतो. या दोन्ही इच्छा क्रिकेटशी संबंधित आहेत.

T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या दोन इच्छा आज पूर्ण झाल्यास वाढदिवसाचं सर्वात मोठं गिफ्ट ठरेल!
Virat Kohli
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 10:48 AM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 33 वा वाढदिवस आहे. आज त्याच्या दोन इच्छा पूर्ण झाल्यास भारतीय कर्णधाराचा हा वाढदिवस खास ठरू शकतो. या दोन्ही इच्छा क्रिकेटशी संबंधित आहेत. खरंतर, आज विराट कोहलीला T20 विश्वचषक 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध मोठा सामना खेळायचा आहे. हा सामना दुबईत होणार आहे. पण, दुबईत होणाऱ्या या सामन्याआधी शारजाहमध्येही एक सामना होणार आहे, ज्यावर आज विराट कोहलीची नजर असेल. (T20 World Cup 2021 : If Virat Kohli’s two wishes are fulfilled today, it will be biggest birthday gift!)

विराट कोहलीला वाढदिवस साजरा करायला आवडेल, पण सेलिब्रेशनची मजा द्विगुणित झाली तर त्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कोणती असू शकते. बर्थडे बॉय विराटची नजर आज त्याच्यावर असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने म्हटल्याप्रमाणे, भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. विराटच्या डोक्यात सगळी समीकरणं आहेत, जेणेकरून भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकेल.

विराटची पहिली इच्छा : नामिबियाने उलटफेर करावा!

आता विराट कोहलीच्या त्या दोन इच्छा काय आहेत, ज्या आज पूर्ण झाल्या तर भारताच्या सेमीफायनल खेळण्याच्या आशाही वाढू शकतात, त्या जाणून घ्या. भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा होऊ शकतो. पण, यासाठी न्यूझीलंडला सामना गमवावा लागेल. अशा परिस्थितीत नामिबियाच्या संघाने आज मोठा उलटफेर केला तर भारतीय कर्णधार कोहलीची ही इच्छा पूर्ण झाल्यास विराट सर्वात आनंदी असेल. हा सामना शारजाहमध्ये आहे, त्यामुळे नामिबियाकडून थोड्या आशा आहेत, कारण याच मैदानावर या संघाने स्पर्धेत आयर्लंडचा पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडला या स्पर्धेत या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

विराटची दुसरी इच्छा : स्कॉटलंडवर मोठा विजय

नामिबियाने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, विराट कोहलीची पहिली इच्छा वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण होताना दिसेल, तर दुसरी इच्छा पूर्ण करणे त्याच्या स्वतःच्या आणि टीम इंडियाच्या उर्वरित सदस्यांच्या हातात आहे. भारताला आज स्कॉटलंडलाही मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, तरच भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल. आजच्या सामन्यात भारताला 60 प्लस धावांनी विजय मिळवणे गरजेचे आहे. आणि जर भारत धावांचा पाठलाग करत असेल तर भारताला स्कॉटलंडने दिलेलं टार्गेट 13 व्या षटकात पूर्ण करावं लागेल.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(T20 World Cup 2021 : If Virat Kohli’s two wishes are fulfilled today, it will be biggest birthday gift!)

भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.