IND vs NZ : या पराभवाचा खूप त्रास होईल; सेहवाग टीम इंडियावर बरसला, अझहरची कोचिंग स्टाफवर टीका
कागदावर बलाढ्य वाटणारा भारतीय क्रिकेट संघ मैदानावर मात्र अपयशी ठरतोय. भारतीय संघासाठी यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई : कागदावर बलाढ्य वाटणारा भारतीय क्रिकेट संघ मैदानावर मात्र अपयशी ठरतोय. भारतीय संघासाठी यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवत भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळवलं आहे. (T20 World Cup 2021, IND vs NZ : This defeat Will Hurt India, Time For Some Serious Introspection : Virender Sehwag)
सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने केवळ 110 धावा केल्या. ज्या पूर्ण करताना न्यूझीलंडला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांनी केवळ 2 विकेट्स गमावत 14.3 षटकात या धावा पूर्ण करत 8 विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला.
दरम्यान, भारताच्या पराभवामुळे तमाम भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. जगभरातील क्रिकेट तज्ज्ञ, क्रीडा समीक्षक, माजी क्रिकेटपटू टीम इंडियावर तुटून पडले आहेत. तर अनेकांनी न्यूझीलंडच्या संघाचं कौतुक केलं आहे. यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचंही (Virendra Sehwag) नाव आहे.
या पराभवाचा खूप त्रास होईल : सेहवाग
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सेहवाग म्हणाला की, “भारताने निराशाजनक कामगिरी केली.” तसेच त्याने न्यूझीलंड संघाचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट केले की, “भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. न्यूझीलंड संघाने शानदार खेळ केला. भारतीय खेळाडूंची देहबोली चांगली नव्हती. संघातील खेळाडूंनी चुकीचे शॉट निवडले, जसे पूर्वी झाले आहे. न्यूझीलंडने भारत पुढच्या फेरीत जाणार नाही याची अक्षरशः खात्री करून घेतली. या पराभवामुळे टीम इंडियाला खूप त्रास होईल. गंभीर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.”
Very disappointing from India. NZ were amazing. India’s body language wasn’t great, poor shot selection & like few times in the past, New Zealand have virtually ensured we won’t make it to the next stage. This one will hurt India & time for some serious introspection #IndvsNZ
— Virender Sehwag (@virendersehwag) October 31, 2021
अझहरकडून कोहलीचा बचाव
या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहलीचा बचाव करत याला केवळ कोहलीच नाही तर संपूर्ण संघच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अजहरने ट्विट करताना लिहिले आहे की. “विराट कोहलीवर टीका होत आहे, पण यासाठी एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण संघ आणि प्रशिक्षकदेखील जबाबदार आहेत. भारतीय चाहत्यांसाठी हे एक भयानक हॅलोविन आहे.”
Virat Kohli is facing criticism but it’s the entire team and the coaches that have failed and not just one man. It turned out to be a scary Halloween for Indian fans. #INDvsNZ #T20WORLDCUP
— Mohammed Azharuddin (@azharflicks) October 31, 2021
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं
(T20 World Cup 2021, IND vs NZ : This defeat Will Hurt India, Time For Some Serious Introspection : Virender Sehwag)