T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 विश्वचषक सामन्याचा थरार सुरु झाला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय ते मैदानावर योग्य ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 8:23 PM

T20 World Cup 2021 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 विश्वचषक सामन्याचा थरार सुरु झाला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय ते मैदानावर योग्य ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. कारण पाकिस्तानने भारताच्या दोन मातब्बर सलामीवीरांना पहिल्या तीन षटकांतच तंबूत परत पाठवलं आहे. पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारताचे रोहित शर्मा आणि के एल राहुल यांची विकेट घेतली आहे.

भारताच्या पहिल्या तीन षटकांत दोन गडी तंबूत

शाहीनने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा बळी घेतला. त्याने रोहितला पायचित पकडलं. त्यामुळे स्टेडियअममध्ये भारतीय चाहत्यांमध्ये शांततेचं वातावरण बघायला मिळालं. रोहित शर्मा बाद झाल्याने भारतीय संघावर दबाव निर्माण झाला. रोहित नंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने खमकेपणाने फलंदाजी करायला सुरुवात केली. पण तिसऱ्या षटकात पुन्हा घात झाला. कारण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सलामीवीर के एल राहुलचा त्रिफळा उडाला. त्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाकडून मैदानात आनंद साजरा करण्यात आला.

भारतीय संघात आतापर्यंत कुणाच्या किती धावा?

भारतीय संघाची आजची सुरुवातच खराब झाली. भारताचा मातब्बर खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा आज पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ के एल राहुल हा क्लिन बोल्ड झाला. दोघांना पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने आऊट केलं. त्यानंतर मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सूर्यकुमार चांगल्याच जोशमध्ये आला होता. त्याने एक चौकार आणि षटकार लगावला. पण सूर्यकुमार अखेर पाकिस्तानच्या हसन अलीच्या बोलवर झेलबाद झाला. रिझवानने त्याचा झेल टिपला आणि भारताचा तिसरा गडी तंबूत परतला. सूर्यकुमारने 8 चेडूत 11 धावा केल्या. त्यानंतर भारताचा तरुण तडफदार खेळाडू ऋषभ पंत विराटला साथ देण्यासाठी मैदानावर दाखल झाला.

अशी आहे भारताची अंतिम 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा,  भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल

स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारताची पडझड सुरुच, तिसरा गडी सूर्यकुमार यादवही बाद

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.