T20 World Cup: बाबर आजमच्या जीवात जीव, सेमीफायनलच्या सामन्यात दोन्ही दिग्गजांना घेऊन उतरणार
पाकिस्तान क्रिकेट टीमने यंदा विश्व चषकाच्या स्पर्धेत अतिशय दमदार कामगिरी करत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. या विजयांमुळे त्यांनी सेमीफायनलमध्ये थेट जागा मिळवली आहे.
T20 World Cup 2021: पाकिस्तान क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) तब्बल 4 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला मात दिल्यानंतर आता पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भिडणार आहे. 2019 च्या विश्वचषकासह 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून ग्रुप राउंडमधूनच बाहेर गेल्यानंतर पाकिस्तानचा संघ यंदा मात्र सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी फिटनेसच्या कारणामुळे संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू मुकणार असल्याची चिन्ह निर्माण झाली होती. ही नावं म्हणजे मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) आणि शोएब मलिक (Shoaib Malik).
पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेजणही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी फिट असल्याचं समोर आलं आहे. या माहितीमुळे संघाचा कर्णधार बाबर आजमची चिंता कमी झाली असणार हे नक्की. कारण यंदाच्या स्पर्धेत या दोघांनीही अप्रतिम कामगिरी केली आहे. सलामीवीर रिजवानने पहिल्या सामन्यापासून उत्तम कामगिरी कायम ठेवसी आहे. तर मलिकनेही मागील सामन्यात 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. पण त्यानंतरही दोघांच्या फिटनेबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे दोघेही सरावासाठी मैदानात आले नव्हते. पण दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आल्याने दोघेही सामन्यासाठी फिट असल्याचं समोर आलं आहे.
दोघांच यंदाच्या स्पर्धतील प्रदर्शन
रिजवानने सलामीला येत बाबर आजमसोबत अप्रतिम भागिदारी खेळी केली आहे. त्याने भारत आणि नामीबियाविरुद्ध अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिले. त्याने 5 डावांत 214 धावा केल्या आहेत. तर मलिकने केवळ 3 डावांत एका अर्धशतकासह 99 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान अवघड
पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात विजय मिळवलेला नाही. 1987 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. त्यानंतर 1999 फायनलमध्येही पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले होते. 2010 टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. 2015 वर्ल्ड कपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने मात दिली. त्यामुळे आजही पाकिस्तानला विजय मिळवताना मेहनत करावी लागणार हे नक्की.
इतर बातम्या
(T20 World Cup 2021 Pak vs Aus Semifinal Pakistan Player Mohammad Rizwan and Shoaib Malik fit to play)