T20 World Cup 2021: रबाडा-नॉर्खियाच्या माऱ्यासमोर बांग्लादेश गारद, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून विजय

| Updated on: Nov 02, 2021 | 9:59 PM

दक्षिण आफ्रिका संघाची विश्वचषकातील कामगिरी उत्तम सुरु असून त्यांनी बांग्लादेशला नमवत आणखी एक विजय मिळवला आहे. ते ग्रुप 1 मध्येही दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.

T20 World Cup 2021: रबाडा-नॉर्खियाच्या माऱ्यासमोर बांग्लादेश गारद, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून विजय
दक्षिण आफ्रिका विजयी
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सुपर 12 मधील ग्रुप 1 मध्ये उत्तम कामगिरी करत बांग्लादेशला मात दिली आहे. या विजयासह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. 4 पैकी 3 सामने जिंकत त्यांनी 6 गुणांसह ते दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशला आफ्रिकेने त्यांच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याने अवघ्या 84 धावांत  सर्वबाद झाले. ज्यानंतर केवळ 4 गडी गमावत 13.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सेमीफायलनमध्ये पोहचण्याच्या दिशेने त्यांनी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने इतर बहुतांश यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय़ संघाचे दिग्गज गोलंदाज नॉर्खिया आणि रबाडा यांनी अगदी बरोबर असल्याचे दाखवत प्रत्येकी 3 विकेट मिळवले. त्यासोबत शम्सीने 2 आणि प्रेटोरियस याने 1 गडी बाद करत बांग्लादेशला 84 धावांवर सर्वबाद केलं. बांग्लादेशने लिटन दास (24) आणि मेहदी हसन (27) यांच्या खेळीमुळे किमान 84 पर्यंत मजल मारली.

कर्णधाराने फिनिश केला सामना

85 धावांचं सोपं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या आफ्रिका संघाला सुरुवातीला काही झटके बसले. पण डस्सेनच्या 22 आणि कर्णदार टेम्बा याच्या नाबाद 31 धावांच्या जोरावर 13.3 ओव्हरमध्येच दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. यावेळी डीकॉकनेही 16 धावांची दिलासादायक सुरुवात संघाला करुन दिली होती. सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल रबाडा याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

इतर बातम्या

विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर

India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘राशिद’ नावाचा खतरा, दिग्गज भारतीय खेळाडूंनाही फुटतो घाम

(T20 World Cup 2021 South Africa beat Bangladesh by 6 wickets in hands)