T20 World Cup: इंग्लंडने वर्ल्ड कप बाहेर होण्यापासून स्वत:ला वाचवलं, ऑस्ट्रेलिया मात्र टेन्शनमध्ये

T20 World Cup:आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालाचा ऑस्ट्रेलियाला फटका, जाणून घ्या ग्रुप 1 मधील पॉइंटस टेबलची स्थिती

T20 World Cup: इंग्लंडने वर्ल्ड कप बाहेर होण्यापासून स्वत:ला वाचवलं, ऑस्ट्रेलिया मात्र टेन्शनमध्ये
ENG vs NZ
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 5:45 PM

ब्रिस्बेन: इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 वर्ल्ड कपमधला महत्त्वाचा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करुन स्वत:ला स्पर्धेबाहेर होण्यापासून वाचवलं. इंग्लंडच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मात्र धक्का बसला आहे. जोस बटलरची टीम या विजयासह ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय.

ऑस्ट्रेलिया का टेन्शनमध्ये?

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप बाहेर जाण्याचा धोका निर्माण झालाय. पॉइंटस टेबलमध्ये न्यूझीलंड टॉपवर आहे. टॉस जिंकून इंग्लंडने पहिली बॅटिंग स्वीकारली. त्यांनी न्यूझीलंडसमोर विजयासाठी 180 धावांच मोठ लक्ष्य ठेवलं. न्यूझीलंडच्या टीमने प्रत्युत्तरात 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 159 धावा केल्या. इंग्लंडने 20 रन्सनी हा सामना जिंकला.

न्यूझीलंडचे फलंदाज इंग्लिश गोलंदाजीसमोर ढेपाळले. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन्सवर आऊट झाला. 8 रन्सवर न्यूझीलंडला झटका बसला. शेवटपर्यंत त्यांची टीम या धक्क्यातून सावरु शकली नाही. फिन एलेनच्या रुपात न्यूझीलंडचा 28 रन्सवर दुसरा विकेट गेला.

फिलिप्स एकटा लढला

2 विकेट गेल्यानंतर केन विलियमसनची टीम अडचणीत सापडली. विलियमसनने ग्लेन फिलिप्ससोबत मिळून एक चांगली भागीदारी केली. टीमची धावसंख्या 119 पर्यंत पोहोचवली. विलियमसन 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर जेम्स नीशामही आऊट झाला. फिलिप्सने एकट्याने संघर्ष केला. 17.3 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फिलिप्सच्या रुपात सहावा धक्का बसला. त्यावेळी त्यांची धावसंख्या 135 होती. त्यानंतर न्यूझीलंडची टीम मॅचमध्ये पुनरागमन करु शकली नाही.

टीम सामने विजय पराजय रनरेटपॉइंटस
न्यूझीलंड 531+2.1137
ऑस्ट्रेलिया 531-0.1737
इंग्लंड 421+0.5475
श्रीलंका 422-0.4574
आयर्लंड 513-1.6153
अफगाणिस्तान 503-0.5712

बटलर-हेल्सकडून दमदार सुरुवात

याआधी इंग्लंडकडून जोस बटलर (73) आणि एलेक्स हेल्स (52) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 179 धावा केल्या. दोघांनी इंग्लंडला दमदार सुरुवात दिली. 81 धावांची भागीदारी केली.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.