T20 World Cup: …तर न खेळताच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल, पाकिस्तान होईल बाहेर

T20 World Cup 2022 मध्ये हो, हे असं घडू शकतं, कसं ते समजून घ्या....

T20 World Cup: ...तर न खेळताच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल, पाकिस्तान होईल बाहेर
Rohit sharma-Axar patelImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 4:19 PM

एडिलेड: T20 वर्ल्डकप 2022 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. सेमीफायनलच्या 4 टीम्स निश्चित झाल्या आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडची टीम आमने-सामने असेल. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडच आव्हान आहे. 15 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कपच जेतेपद मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला इंग्लंडला हरवाव लागेल. टीम इंडिया सेमीफायनल खेळल्याशिवायही फायनलमध्ये पोहोचू शकते.

सेमीफायनल न खेळताच फायनलमध्ये कसं पोहोचणार?

भारतच नाही, न्यूझीलंड सुद्धा सेमीफायनल खेळल्याशिवाय फायनलमध्ये पोहोचू शकते. पावसामुळे दोन्ही सेमीफायनल्स रद्द झाल्या, तर अशा परिस्थिती भारत आणि न्यूझीलंडचे संघ फायनलमध्ये दाखल होतील.

नियम काय सांगतो?

नियमानुसार, दोन्ही ग्रुपच्या टॉप टीम्स सामना रद्द झाल्यास थेट फायनलमध्ये पोहोचतील. न्यूझीलंडची टीम 7 पॉइंटसह ग्रुप 1 मध्ये टॉपवर आहे. भारत 8 पॉइंटसह ग्रुप 2 मध्ये टॉपवर आहे. न्यूझीलंडची टीम 9 नोव्हेंरबला सिडनीमध्ये आणि भारत 10 नोव्हेंबरला एडिलेडमध्ये सेमीफायनल खेळेल.

पावसासाठी एक खास नियम काय?

आयसीसीने दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी रिजर्व डे ठेवला आहे. म्हणजे पावसामुळे सामना सुरु झाला नाही, तर दुसऱ्यादिवशी सामना होईल. सामन्यादरम्यान पाऊस झाला, तर दोन्ही इनिंग्समध्ये पाच-पाच ओव्हरचा खेळ होण्याची वाट पाहिली जाणार नाही. सेमीफायनल आणि फायनलसाठी दोन्ही इनिंग्समध्ये कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा आहे. असं झालं नाही, तर मॅच रिजर्व डे च्या दिवशी सुरु होईल.

सिडनीमध्ये पावसाची शक्यता किती?

सिडनीमध्ये सेमीफायनल मॅचच्या दिवशी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान इथे क्षणा-क्षणाला बदलतय. पाऊस कोसळू नये, अशीच पाकिस्तानची प्रार्थना असेल. सलग दोन दिवस पाऊस झाला, तर न खेळताच पाकिस्तानच आव्हान संपुष्टा येऊ शकतं. एडिलेडमध्ये 10 नोव्हेंबरला पावसाची शक्यता 4 टक्के आहे. यादिवशी भारताचा इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामना आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.