IND vs AUS Warm up Match: पुन्हा एकदा सूर्याची कडक बॅटिंग, रोहित, विराट, हार्दिक, दिनेशकडून निराशा

IND vs AUS Warm up Match: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलं इतक्या धावांच आव्हान

IND vs AUS Warm up Match: पुन्हा एकदा सूर्याची कडक बॅटिंग, रोहित, विराट, हार्दिक, दिनेशकडून निराशा
सूर्यकुमार यादवImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 11:19 AM

मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) ब्रिस्बेन येथे वॉर्मअप मॅच सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिली बॅटिंग दिली. टीम इंडियाने (Team India) सुरुवातही धडाकेबाज केली होती. पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्येच टीम इंडियाने 69 धावा फटकावल्या होत्या. केएल राहुल (KL Rahul) आणि कॅप्टन रोहित शर्माची जोडी ओपनिंगला उतरली होती. केएल राहुलने टीम इंडियाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली.

राहुलची तुफानी बॅटिंग

केएल राहुलने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस कोणालाही दयामाया दाखवली नाही. त्यांच्या गोलंदाजीवर तो तुटून पडला. राहुलची तडाखेबंद इनिंग 8 व्या ओव्हरमध्ये संपली. राहुलने 33 चेंडूत 57 धावा फटकावल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर त्याने आगरकडे झेल दिला.

विराट, हार्दिककडून निराशा

आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिककडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांनी निराश केलं. रोहित शर्माला पहिली धाव काढण्यासाठी पाच षटक लागली. रोहित 14 चेंडूत 15 धावा, विराट कोहली 13 चेंडूत 19 धावांवर आऊट झाला. हार्दिक पंड्या अवघ्या 2 रन्सवर बाद झाला. फिनिशरच्या रोलमध्ये असलेल्या दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 20 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.

सूर्या चमकला

आजच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव चमकला. त्याने चौफेर फटकेबाजी केली. लास्टओव्हरमध्ये सूर्या आऊट झाला. सूर्याने 33 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 1 षटकार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सराव सामन्यातही सूर्याने अर्धशतकी खेळी केली होती.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला किती धावांचे लक्ष्य दिले?

केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांचा संघर्ष सुरु होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळेच टीम इंडियाने 180 धावांचा टप्पा ओलांडला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 7 बाद 186 धावा केल्या.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.