Warm up Match IND vs AUS: टीम इंडियाने हरणारी मॅच कशी जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारण

Warm up Match IND vs AUS: फक्त शमीच्या चार विकेटच नाही, 'या' पाच कारणांमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय

Warm up Match IND vs AUS: टीम इंडियाने हरणारी मॅच कशी जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारण
Team india
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 4:22 PM

मुंबई: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World cup) पहिल्या वॉर्म अप मॅचमध्ये (Warm up Match) शानदार आणि रोमांचक विजय मिळवला. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS) हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. टीम इंडियाच्या शानदार फलंदाजीशिवाय डेथ ओव्हर्समधील बॉलिंगमुळे टीम इंडियाने ही मॅच जिंकली. एकवेळ ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण भारताने डाव उलटवला.

टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन कसं केलं? हरणारी मॅच कशी जिंकली? त्याबद्दल जाणून घेऊया. भारताने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची टीम 180 धावांवर ऑलआऊट झाली.

केएल राहुलची हाफ सेंच्युरी

केएल राहुलने आज मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्यामुळेच भारताने पावरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. 6 ओव्हर्सनंतर रोहितने 9 चेंडूत केवळ 13 धावा केल्या होत्या. त्याचवेळी राहुलच्या 27 चेंडूत 50 धावा झाल्या होत्या.

सूर्यकुमारची इनिंग

केएल राहुल बाद झाल्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टिवर टिकत नव्हता. त्यावेळी सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. त्याने डाव सावरला. लास्ट ओव्हरमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. त्याच्या फलंदाजीमुळे टीम 186 धावांपर्यंत पोहोचली. सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

हर्षल पटेलची 19 वी ओव्हर

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. 19 वी ओव्हर हर्षल पटेलला देण्यात आली. त्याने या ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन फक्त 5 रन्स दिल्या. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फिंचला बोल्ड करुन हर्षलने टीम इंडियाला मोठ यश मिळवून दिलं. फिंचने 79 धावा केल्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर इंग्लिस रनआऊट झाला.

शमीची निर्णायक ओव्हर

मोहम्मद शमीला लास्ट ओव्हर मिळाली. त्याला 11 रन्स डिफेंड करायचे होते. शमीच्या पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा निघाल्या. त्यानंतर शमीच रौद्ररुप पहायला मिळालं. कमिन्सने त्याच्या गोलंदाजीवर कोहलीकडे झेल दिला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कार्तिक आणि शमीने मिळून एगरला रनआऊट केलं. ओव्हरच्या दोन चेंडूंवर शमीने अचूक यॉर्कर टाकले. पहिल्या बॉलवर जॉश इंग्लिस आणि त्यानंतर रिचर्डसन बोल्ड झाला.

कोहलीची फिल्डिंग

विराट कोहलीने या मॅचमध्ये बॅटने विशेष कमाल केली नाही. पण जबरदस्त फिल्डिंग त्याने केली. कोहलीने 19 व्या ओव्हरमध्ये जॉश इंग्लिसला शानदार डायरेक्ट थ्रो वर रनआऊट केलं. त्यानंतर कमिन्सची लाँग ऑनला बाऊंड्री लाइनवर शानदार कॅच घेतली. कमिन्सने षटकाराच्या उद्देशाने हा फटका मारला होता.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.