T20 World Cup: भारतासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीला भिडली अफगाण सुंदरी, म्हणाली, आता तर….
T20 World Cup: सहरच्या या टि्वटला वाजमाने उत्तर दिलय. अल्लाहच्या कृपने....
काबूल: टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेच्या टीमने पाकिस्तानला 1 रन्सने हरवलं. क्रिकेटमधल्या या धक्कादायक निकालाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. बाबर आजमची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. पाकिस्तानचा झिम्बाब्वेकडून झालेला हा पराभव पाकिस्तानी सेलिब्रिटींना पचवता येत नाहीय. खरंतर या जय-परायजयाशी टीम इंडियाचा दुरान्वयेही संबंध नाहीय.
तिने शोएब अख्तरच्या पावलावर पाऊल ठेवलय
पाकिस्तानची टीम खराब खेळली म्हणून ते हरले. पण पाकिस्तानातील सेलिब्रिटी भारतावर खापर फोडतायत. आधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या पराभवाची इच्छा व्यक्त केली. आता एक पाकिस्तानी अभिनेत्री या पराभवाने गोंधळून गेलीय. तिने सुद्धा भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केलीय.
बिजनेस वुमन वाजमा अयूबीने उत्तर दिलय
या पाकिस्तानी अभिनेत्रीला अफगाणिस्तानची बिजनेस वुमन वाजमा अयूबीने उत्तर दिलय. वाजमाच्या उत्तराने पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी आणखी खवळली आहे. वाजमा अयूबी तिच्या सौंदर्यासाठी सुद्धा ओळखली जाते.
तिने टि्वटमध्ये काय म्हटलय?
सहर शनिवारीने टि्वट केलं. झिम्बाब्वे आणि बांग्लादेश विरुद्ध भारताचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. भारताच्या पराभवाने माझ्या मनाला शांती मिळेल, असं शिनवारीने टि्वटमध्ये म्हटलय.
Allah karey k India World Cup hi jeet jayi inshallah ? what a historic win for #Zimbabwe though ? https://t.co/8Bj7SivBGB
— Wazhma Ayoubi (@WazhmaAyoubi) October 28, 2022
भारतानेच वर्ल्ड कप जिंकू दे
सहरच्या या टि्वटला वाजमाने उत्तर दिलय. अल्लाहच्या कृपने भारताने वर्ल्ड कप जिंकू दे असं तिने टि्वटमध्ये म्हटलय. झिम्बाब्वेच्या विजयाचही तिने कौतुक केलय. वाजमान एक फॅशन लेबल चालवते. आशिया कप 2022 मध्ये भारत आणि अफगाणिस्तानात सामना झाला. या मॅचला वाजमाची उपस्थित होती. त्यावेळी आपल्या ट्रेडिशनल लूकमुळे ती इंटरनेट सेंसशन बनली होती.