T20 World Cup: अरे, ए बाबा सांभाळ, LIVE मॅचमधला हा VIDEO पाहून तुम्ही पोट धरुन हसाल

T20 World Cup: फिल्डिंग करताना किंवा धावा पळताना हा प्लेयर पडला नाही, कसा पडला ते या व्हिडिओमध्ये बघा

T20 World Cup: अरे, ए बाबा सांभाळ, LIVE मॅचमधला हा VIDEO पाहून तुम्ही पोट धरुन हसाल
aayan-AfzalImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 5:17 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World cup) स्पर्धा सुरु झाली आहे. टुर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. नामीबियाने (Namibia) आशियाई चॅम्पियन (Asian Champion) श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. जय-पराजय एवढ्यापुरताच आजचा दिवस मर्यादीत नाही. आजच्या दिवशी मैदानात काही वेगळ्या गोष्टी सुद्धा घडल्या. जो खेळाडूसाठी वाईट अनुभव होता, पण स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक आणि मोबाइल स्क्रीनवर सामना पाहणारे खळखळून हसले.

नेदरलँड विरुद्ध UAE सामन्यातली घटना

नामीबियाच्या शानदार विजयानंतर नेदरलँडस आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामना झाला. जीलॉन्गमध्ये झालेल्या या सामन्यात UAE ने पहिली बॅटिंग केली. पण त्यांचे फलंदाज काही खास करु शकले नाहीत. सतत विकेट पडत होत्या. UAE चा स्पिनर आयान अफजल खानही आऊट होणाऱ्या फलंदाजांमध्ये होता. तो लवकर बाद झाला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आयानने 7 चेंडूत फक्त 5 धावा केल्या.

तोंडावर पडला

आयान लवकर आऊट झाला, यात काहीही चूकीच नाहीय. पण त्यानंतर जे झालं, ते निश्चित थोडं लाजिरवाणं होतं. आयान डावाच्या शेवटच्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतत होता. त्यावेळी बाऊंड्री लाइनवरील रशीमध्ये पाय अडकून तो तोंडावर पडला.

कॉमेंटेटर्सनाही हसू आवरलं नाही

आयान खाली पडल्यानंतर कॉमेंटेटर्सनाही आपलं हसू आवरता आलं नाही. स्टेडियमध्ये सामना पहायला आलेले प्रेक्षकही खळखळून हसले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. आयानने लगेचच स्वत:ला सावरला व उभा राहून पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.