T20 World Cup 2024 : फ्लोरिडाचा पाऊस पाहून पाकिस्तानला धडकी, दिग्गज खेळाडूची ICC कडे मोठी मागणी
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये ग्रुप ए मध्ये आता फक्त तीन सामने बाकी आहेत. सर्व सामने फ्लोरिडाच्या लॉडरहीलमध्ये होणार आहेत. तिथे पाऊस आणि पुराचा धोका आहे. पाकिस्तानसह अन्य सामने रद्द होण्याचा धोका आहे.
T20 वर्ल्ड कपचा पहिला टप्पा संपण्याच्या मार्गावर आहे. 19 जूनपासून सुपर-8 चे सामने सुरु होतील. पण त्याआधी पावसामुळे काही टीम्सचा खेळ बिघडू शकतो. श्रीलंकेच्या टीमला आधीच हा फटका बसलाय. पावसामुळे इंग्लंडच्या टीमला सुद्धा सुपर-8 मध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आता पाकिस्तानी टीमवर या पावसाचा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानी टीम T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मध्ये आहे. त्यांचा पुढचा सामना फ्लोरिडामध्ये आहे. सर्वच सामन्यांवर पावसाच सावट आहे. पावसामुळे कुठलाही सामना रद्द झाला, तर पाकिस्तानी टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर जाईल. त्यामुळे पाकिस्तानी टीम टेन्शनमध्ये आहे. पाकिस्तानचा माजी कॅप्टन अजहर अलीने पावसाचा धोका लक्षात घेऊन आयसीसीकडे मोठी मागणी केलीय.
बाबर आजमच्या टीमला टुर्नामेंटमध्ये पुढे जायच असेल, तर निसर्गाची साथ आवश्यक आहे. सध्या निर्सगाची साथ पाकिस्तानच्या टीमला मिळताना दिसत नाहीय. पाकिस्तानी टीमला निसर्गाचा फटका बसू शकतो. पावसामुळे पाकिस्तानचा सामना रद्द होण्याचा धोका आहे. अजहर अलीने चिंता व्यक्त केलीय. फ्लोरिडामध्ये पुराचा धोका लक्षात घेऊन त्यांनी आयसीसीकडे तिथून सामने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याची मागणी केली आहे.
न्यू यॉर्कच्या विकेटवर प्रश्नचिन्ह
अनेक सामन्यांवर पावसाचा परिणाम होऊ शकतो, हे आयसीसीला माहितीय. त्यामुळे त्यांना पाऊल उचलाव लागेल. तिथे होणारे सामने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावेत. अजहरने आयसीसीचे निर्णय आणि व्यवस्था यावर टीका केली. आधीच न्यू यॉर्कच्या विकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. आता आणखी सामने रद्द झाल्यास पुन्हा प्रश्न निर्माण होतील.
पॉइंट टेबलमध्ये कुठली टीम, कितव्या स्थानावर?
पाकिस्तानची टीम तीन सामन्यात 2 पॉइंटसह ग्रुप ए टेबल पॉइंटमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. या ग्रुपमधून भारतीय टीमने आधीच सुपर-8 साठी क्वालिफाय केलय. आता या ग्रुपमधून फक्त एकच टीम सुपर-8 साठी क्वालिफाय करु शकते. पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिकेची टीम शर्यतीत आहे. आयर्लंडचे दोन सामने बाकी आहेत. पण नेट रन रेटमुळे त्यांना आधीच बाहेर समजल जातय. अमेरिकेची टीम 3 सामन्यात 4 पॉइंटसह दुसऱ्या नंबरवर आहे. पाकिस्तानी टीम जास्तीत जास्त 4 पॉइंट पर्यंत पोहोचू शकते.