IND vs SA Final : टीम इंडियाची स्थिती नाजूक असताना राहुल द्रविड उतरला मैदानात, विराट-अक्षरला दिला कानमंत्र

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने पहिल्या षटकात चांगली फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या षटकापासून टीम इंडिया बॅकफूटवर गेली. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दडपण वाढलं. पण विराट कोहली आणि अक्षर पटेलने काही अंशी डाव सावरला. मात्र बोर्डवर हव्या तशा धावा नसल्याचं पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानात उतरला आणि त्याने कानमंत्र दिला.

IND vs SA Final : टीम इंडियाची स्थिती नाजूक असताना राहुल द्रविड उतरला मैदानात, विराट-अक्षरला दिला कानमंत्र
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 9:06 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दहा षटकात दक्षिण अफ्रिका संघ भारतावर हावी झाल्याचं दिसून आलं. पहिल्या षटकात 15धावा आल्याने दक्षिण अफ्रिका संघ बॅकफूटवर आला होता. मात्र दुसऱ्या षटकात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. रोहित शर्माला बाद सामन्यात असल्याचं दखवून दिलं. त्यानंतर त्याच षटकात ऋषभ पंतची विकेट गेली आणि टीम इंडिया बॅकफूटवर गेली. ऋषभ पंतच्या विकेटनंतर धावगतीला खिळ बसली. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही काही खास करू शकला नाही. पाचव्या षटकात जोरदार फटका मारताना बाद झाला. त्याने फक्त 3 धावा केल्या. त्यामुळे 180 धावांची मजल मारणं खूपच कठीण झालं. अशा विराट कोहलीच्या साथीला अक्षर पटेल आला. अक्षर पटेल या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही क्षेत्रात आपली छाप टाकत आहे. त्यामुळे भारताला अपेक्षित धावगती मिळाली. दहा षटकात भारताने 3 गडी गमवून 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे पुढच्या 10 षटकांचं गणित काही वेगळं होतं. त्यामुळे कोणाकडे मेसेज न देता ड्रिंक ब्रेकमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड स्वत: मैदानात उतरला.

प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कारकिर्दितील ही शेवटची स्पर्धा आणि सामना आहे. अशा स्थितीत टीम इंडियाकडून चांगल्या सेंड ऑफची अपेक्षा आहे. राहुल द्रविडने सर्वात आधी विराट आणि अक्षरला काहीतर समजावून सांगितलं. त्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर हात टाकून बाजूला गेला आणि कानात काय तरी सांगत. पाठीवर थाप दिली. आता राहुल द्रविडची रणनिती कामी येते का? आणि भारताला दुसऱ्या जेतेपदाची चव चाखायला मिळणार का? याबाबत चाहत्यांमध्ये चलबिचल आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.