IND vs USA : माझ्या ट्रॅक्टरचे पैसे भारतामुळे वसूल, मॅचनंतर काय म्हणाला पाकिस्तानी चाहता? VIDEO
IND vs USA : भारत-पाकिस्तान सामना म्हटला की, चाहत्यांचा उत्साह, आनंद एक वेगळाच असतो. विजयाने या चाहत्यांच्या आनंदाला उधाण येतं, ते जल्लोष करतात. त्याचवेळी पराभव झाला तर हे चाहते उदास होतात. अशाच एका पाकिस्तानी चाहत्याची इंटरेस्टिंग गोष्ट समोर आलीय.
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 9 जूनला भारत-पाकिस्तानमध्ये एका हाय वोल्टेज सामना झाला. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे फॅन्स बराच पैसा खर्च करुन अमेरिकेत पोहोचले होते. एका पाकिस्तानी फॅनने न्यू यॉर्कमधील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्वत:चा ट्रॅक्टर विकला. पण तिथे येऊन त्याची निराशा झाली. कारण पाकिस्तानचा भारताने पराभव केला. पाकिस्तानच्या पराभवाने तो निराश झाला होता. तोच पाकिस्तानी फॅन भारत-अमेरिका सामना पाहण्यासाठी पोहोचला. त्यावेळी सूर्यकुमार यादवची बॅटिंग पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
9 जूनचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानी चाहता पूर्णपणे हताश झाला. त्याने विजयानंतर भारतीय चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्याने सांगितलं की, “न्यू यॉर्कला येऊन सामना पाहण्यासाठी 3000 डॉलर म्हणजे 2.50 लाख रुपयांमध्ये ट्रॅक्टर विकला” आता भारत-अमेरिका सामन्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो खूप आनंदी दिसतोय. मागचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाल्याच त्याने सांगितलं. म्हणून अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने टीम इंडियाला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याने हे सुद्धा सांगितलं की, “मी बाबर आजमला पहायला आलेलो. पण खूप निराश झालो. सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने मन जिंकलं. पैसा सुद्धा वसूल झाला”
#WATCH | New York, USA: “I sold my tractor for $3000 to watch the India vs Pakistan match, in which we lost. I was very disappointed… Surya has won my heart today. Tractor ke paise India ne vasool karva diye,” says a Pakistani fan on India’s win against US in the T20 World Cup. pic.twitter.com/9wJdoOjpRS
— ANI (@ANI) June 13, 2024
पाकिस्तानची टीम सुपर-8 मध्ये कशी पोहोचणार?
T20 वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप A मध्ये अमेरिकेला हरवून भारताने सुपर-8 मध्ये क्वालिफाय केलय. पाकिस्तानी टीम 3 मॅचमध्ये 2 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना 10 चेंडू राखून जिंकत पाकिस्तानच काम सोपं केलय. आता आयर्लंड विरुद्ध अमेरिकेची हार व्हावी ही पाकिस्तानची इच्छा असेल. त्यानंतर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी फक्त आयर्लंडला हरवाव लागेल. अमेरिकेचा NRR +0.127 आहे, त्याचवेळी पाकिस्तानचा NRR +0.191 आहे.