Photos: टीम सेमीफायनलमध्ये पोहोचताच रस्त्यावर उतरली अफगाणिस्तानची लोकं
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये लोकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरली होती.
Follow us
T20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरलाय. रशीद खानच्या संघाने सुपर-8 सामन्यात बांगलादेशचा पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक दिलीये.
अफगाणिस्तानने प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. संघ उपांत्य फेरीत पोहोचताच अफगाणिस्तानमधील लोकांनी आनंदाने जल्लोष केला.
अफगाणिस्तानात जल्लोष करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली. ज्याचे काही फोटो अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेच शेअर केले आहेत.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 115/5 धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशच्या डावात पावसाने अनेकदा व्यत्यय आणला, ज्यामुळे त्यांना DLS अंतर्गत 19 षटकांत 114 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. बांगलादेशचा संघ 17.5 षटकांत 105 धावांत सर्वबाद झाला.