Team India : विमानात टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफीसह काय धमाल, मस्ती केली ते एकदा या VIDEO मध्ये बघा
Team India : टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा विमान प्रवासातील एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा प्रवास सोपा नव्हता.
टीम इंडिया अखेर पाच दिवसांनी मायदेशात दाखल झाली आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाच्या मायदेशातील आगमनाला विलंब झाला. टीम इंडिया प्रतिष्ठेची ICC ट्रॉफी जिंकून मायदेशी परतली आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा प्रवास सोपा नव्हता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांवर टीम इंडियाने मात केली. अवघ्या सात महिन्यांपूर्वी टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया नव्या जोमाने पुन्हा एकदा मैदानात उतरली होती.
तब्बल 13 वर्षांनी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 साली टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आज जी ट्रॉफी टीम इंडियाच्या हातात आहे, त्यामागे बरेच परिश्रम, मेहनत आहे. त्यामुळे खेळाडूंना झालेला आनंद, त्यांच सेलिब्रेशन या क्षणांवर त्यांचा पूर्ण हक्क आहे.
#WATCH | “Travelling with the prestigious World Cup trophy on the way back home” tweets BCCI
(Video Souce: BCCI) pic.twitter.com/1Fc7B6V5yi
— ANI (@ANI) July 4, 2024
मोहम्मद सिराज, चहल काय म्हणाले?
टीम इंडिया बार्बाडोसहून स्पेशल फ्लाईटने भारतात दाखल झाली. 15 तासाच्या या प्रवासात टीम इंडियातील खेळाडूंनी खूप धमाल, मस्ती केली, त्या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. त्याशिवाय मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलची प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते. “वर्ल्ड कपची ट्रॉफी माझ्या हातात आहे, ही खूप सुंदर भावना आहे. ही ट्रॉफी हातात घेण्यासाठी खूप मेहनत केलीय. मी भाग्यवान आहे. आज ट्रॉफी माझ्या हातात आहे. मला खूप मस्त वाटतय” असं मोहम्मद सिराज म्हणाला. ‘ही भवान शब्दात मांडता येणार नाही. मी भाग्यवान आहे’ असं युजवेंद्र चहल म्हणाला.