T20 World Cup: आसिफ अलीच्या बंदूकवाल्या अॅक्शनवर अफगाणिस्तानचे राजदूत संतप्त, म्हणाले…
पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत अफगाणिस्तानच्या हातात असलेला सामना हिरावला. अफगाणिस्तान संघाने त्यांना पराभूत केले असते पण आसिफ अलीने निर्णायक वेळी आपल्या फलंदाजीने संघाला तारलं.
दुबई : पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत अफगाणिस्तानच्या हातात असलेला सामना हिरावला. अफगाणिस्तान संघाने त्यांना पराभूत केले असते पण आसिफ अलीने निर्णायक वेळी आपल्या फलंदाजीने संघाला तारलं. आसिफने एकाच षटकात चार षटकार ठोकत संघाला एक षटक आधीच विजय मिळवून दिला आणि आपल्या संघाला दारुण पराभवापासून वाचवले. तेव्हापासून आसिफ चर्चेत आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. मात्र याचदरम्यान एक व्यक्ती आसिफवर चिडली आहे. ही व्यक्ती आहे अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत एम. अश्रफ हैदरी. (T20 World Cup : Afghanistan ambassador angry over Asif Ali Gunshot action)
असिफने सामन्याच्या शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही आणि त्यांनी शनिवारी ट्विटरवरून आसिफवर टीका केली. त्याने लिहिले की, “पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बंदूक दाखवणे हे लज्जास्पद कृत्य आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्याला आणि त्याच्या संघाला कडवे आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळ ही हेल्दी स्पर्धा, मैत्री आणि शांतता यासाठी आहे.
A disgraceful act of aggression from Pakistan’s prominent cricket player @AasifAli2018, pointing his bat like a gun towards Afghan players, who gave him and his teammates a tough time. Above all, sports is about healthy competition, friendship and peace. Time for war will come! pic.twitter.com/Iv6WxnZv3H
— Ambassador M. Ashraf Haidari (@MAshrafHaidari) October 30, 2021
पाकिस्तानची हॅट्ट्रिक
पाकिस्तान क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आधी भारत मग न्यूझीलंड अशा बलाढ्य संघाना मात दिल्यानंतर शुक्रवारी अफगाणिस्तान संघालाही 5 विकेट्सने नमवत गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला 147 धावांवर रोखलं. त्यानंतर 148 धावांचं लक्ष्य पाकने 5 विकेट्सच्या बदल्यात 19 षटकातचं पूर्ण केलं.
सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने अफगाणिस्तानने फलंदाजीचा थोडा वेगळा निर्णय घेतला. वेगळा यासाठी कारण यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत आहे. पण अफगाणिस्तानने फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण तो खास चांगाल ठरला नाही. संपूर्ण संघ मिळून केवळ 147 धावाच करु शकला. त्यातही वरची फळी संपूर्णपणे फेल गेली असताना कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलाबदीन यांनी प्रत्येकी नाबाद 35 धावा करत संघाला किमान 147 धावापर्यंत पोहोचवलं. यावेळी इमाद वसिमने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन, रौफ, हसन अली आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
148 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने उत्कृष्ट अर्धशतक झळकावत 51 धावा केल्या. त्याला सोबत देत फखर जमानने 30 धावांची खेळी केली. पण संघाला खरी गरज असताना अखेरच्या काही षटकात असीफ अलीने 7 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 25 धावा केल्या. ज्याच्या जोरावर सामन्यातही त्याने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. असीफ अलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
इतर बातम्या
T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे
(T20 World Cup : Afghanistan ambassador angry over Asif Ali Gunshot action)