T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले…

T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले...
भरत अरुण
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:47 PM

मुंबई : T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताच्या खराब कामगिरीवर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भरत अरुण म्हणाले की, आम्ही कोणतंही कारण देणार नाही, मात्र एक सत्य आपण स्वीकारायला हवं की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या टॅलेंटनुसार कामगिरी केली नाही. (T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

भारतीय संघ आपला शेवटचा साखळी सामना सोमवारी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पत्रकारांना सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळला नाही. दुबईत होणाऱ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीला जास्त महत्त्व असले, तरी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला खूप फायदा होत आहे.

पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही: भरत अरुण

भरत अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी कोणतीही सबब देत नाही, पण या विश्वचषकात असे दिसून आले आहे की नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला खूप फायदा होतो, विशेषत: जेव्हा तुम्ही दुबईत खेळता तेव्हा. जेव्हा तुम्ही नंतर गोलंदाजी करता तेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते. हे एक निमित्त नाही, आपण अधिक चांगले प्रदर्शन केले पाहिजे. पहिल्या सामन्यात आम्हाला लक्ष्य वाचवण्याची संधी होती पण आमची गोलंदाजी सरासरी होती.

2 सामने गमावल्यानंतर भारताचे पुनरागमन

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 39 चेंडूत गाठलं आणि सेमीफायनलच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. मात्र, टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. जर अफगाणिस्तानने या सामन्यात विजय मिळवल आणि त्यानंतर टीम इंडियाने नामिबियावर विजय मिळवला, तरच विराट आणि कंपनी सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. किवी संघ उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने असे होणे कठीण आहे. पहिले दोन सामने गमावल्यामुळे टीम इंडिया अशा प्रकारे अडचणीत सापडली आहे.

इतर बातम्या

निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा

T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट

(T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.