T20 WC, IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे युद्ध नव्हे शांती प्रस्थापित व्हावी, युएईतल्या चाहत्यांना केवळ मनोरंजन आणि खेळ हवा
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीला अजून बराच वेळ आहे, पण रविवारच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा रोमांच अंतिम सामन्यापेक्षा अधिक आहे. हा सामना या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना असणार आहे.
दुबई : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीला अजून बराच वेळ आहे, पण रविवारच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा रोमांच अंतिम सामन्यापेक्षा अधिक आहे. हा सामना या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना असणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मैदानावर खेळाडू विजयासाठी लढतील तर सोशल मीडियावरील चाहते त्यांच्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. भारतातील अनेक चाहते या सामन्याला युद्धाचे नाव देत आहेत, तर काहींना हा खेळ शांततेचे प्रतीक आहे असे वाटते. (T20 World Cup Fans wants peace from India vs Pakistan match)
भारतात अनेक ठिकाणी या सामन्याला विरोध होत आहे. पाकिस्तान भारतविरोधीत दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये. मात्र, बीसीसीआयने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ किंवा बीसीसीआय या बाबतीत मागे हटू शकत नाही. यादरम्यान, दुबईमध्ये राहणारे दोन्ही देशांचे नागरिक या हाय व्होल्टेज सामन्याच्या बहाण्याने शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.
चाहत्यांना शांततेची आशा
यूएईमध्ये राहणारे पाकिस्तानी नागरिक मोहम्मद अशरफ यांनी एएफपीसोबतच्या संभाषणात सांगितले की, ‘आपण एकत्र अधिक क्रिकेट खेळले पाहिजे. या दोन संघांना क्रिकेटच्या मैदानावर पाहून खूप आनंद होतो. राजकारण यापासून दूर ठेवले पाहिजे आणि राजकारण्यांना त्याचा लाभ घेण्याची संधी देऊ नये. खेळाडूंना फक्त क्रिकेट खेळू दिले पाहिजे. मी दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी प्रार्थना करतो.” अबुधाबीमध्ये काम करत असलेली भारताची पंखुरी म्हणाली, ‘मॅचची तिकिटे ऑनलाइन येताच मी तिकिटे खरेदी केली. मी अशा संधींची वाट पाहात होते. मला माहित आहे की दोन देशांमध्ये परस्थिती फारशी बरी नाही, मात्र ती परिस्थिती सुधारण्याचे काम सरकारचे आहे. मी माझ्या पतीसोबत या सामन्याचा आनंद घेणार आहे.
पाकिस्तान संघाने आजपर्यंत भारताविरुद्ध कधीही विश्वचषकातील सामना जिंकलेला नाही. यावेळी बाबर आझम ही परिस्थिती बदलेल, अशी आशा पाकिस्तानच्या चाहत्यांना आहे. दुबईत टॅक्सी चालवणारे पाकिस्तानचे चाहते हसन शेख म्हणतात, ‘इन्शाअल्लाह आम्ही जिंकू. हा एक नवीन दिवस आहे आणि रेकॉर्ड बनवण्याची संधी पाकिस्तानी संघाकडे आहे. आमच्याकडे चांगली टीम आहे आणि बाबर आमचा कर्णधार आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली हे भारतासाठी धोकादायक ठरतील.
इतर बातम्या
(T20 World Cup Fans wants peace from India vs Pakistan match)