IND vs SA : फायनलसाठी भारताचे शिलेदार सज्ज, प्लेइंग इलेव्हनमधून या खेळाडूला डच्चू?

India Playing XI : T20 वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय टीम पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या फक्त १ पाऊल दूर आहे. फायनल सामन्यासाठी भारतीय संघाने रणनिती तयार केली असून भारताचे प्लेईंग इलेव्हन कोण असेल याबाबत ही चर्चा रंगत आहेत. कोणाला डच्चू मिळणार जाणून घ्या.

IND vs SA : फायनलसाठी भारताचे शिलेदार सज्ज, प्लेइंग इलेव्हनमधून या खेळाडूला डच्चू?
T20 world cup playing 11
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 8:42 PM

India Playing XI for T20WC Final : भारतीय संघ (Team India) दुसरा टी-20 विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताचा सामना एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचलेल्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये एकही चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे. अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. सध्या विराट कोहली आणि शिवम दुबे यांना खास कामगिरी करता आलेली नाही. तर ते अजूनही संघात आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाला ही खास कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडिया सातत्याने जिंकत आली आहे. पण फायनल सामन्यात काही बदल दिसू शकतात.

यशस्वी जैस्वाल परतणार का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) अंतिम सामन्यात यशस्वी जैस्वालचे पुनरागमन झाले तर तो रोहित शर्मासोबत सलामी करू शकतो. अशा स्थितीत विराट कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. कोहली संपूर्ण स्पर्धेत सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. आता जर तो तिसऱ्या क्रमांकावर आला तर भारताला देखील याचा फायदा होऊ शकतो. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. शिवम दुबेच्या जागी डावखुरा फलंदाज पंत खेळू शकतो.

गोलंदाजीत कोणताही बदल होणार नाही

हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे भारतीय संघात अष्टपैलू म्हणून खेळत आहेत आणि तिघेही फलंदाजी तसेच गोलंदाजी करत आहेत. हे तिघे अंतिम फेरीत संघात राहू शकतात. जडेजा फारसा प्रभाव पाडू शकला नसला तरी तो संघात राहू शकतो. कुलदीप यादवने आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाज म्हणून संघात राहतील.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल/शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (सी), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.