शाळेत एकत्र खेळणारे जिवलग मित्र आज T20 World Cup च्या फायनलमध्ये आमने-सामने

T20 विश्वचषक स्पर्धेत आज जेव्हा दोन शेजारी देश म्हणजेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडतील, तेव्हा या सामन्यात बालपणीचे दोन मित्रही आमनेसामने असतील.

शाळेत एकत्र खेळणारे जिवलग मित्र आज T20 World Cup च्या फायनलमध्ये आमने-सामने
Marcus Stoinis & Daryl Mitchell
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 10:48 AM

मुंबई : टी-20 वर्ल्डकप 2021 च्या फायनलमध्ये आज आपल्याला दोन बालपणीचे मित्र एकमेकांविरोधात खेळताना दिसतील. होय, आज जेव्हा दोन शेजारी देश म्हणजेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडतील, तेव्हा या सामन्यात बालपणीचे दोन मित्रही आमनेसामने असतील. जे एकेकाळी शाळेत एकत्र क्रिकेट खेळायचे ते आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आम्ही बोलत आहोत न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल (Daryl Mitchell) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिसबद्दल (Marcus Stoinis). शालेय क्रिकेटमध्ये दोघेही एकत्र खेळायचे. पण नंतर चांगले क्रिकेटपटू बनण्याच्या इच्छेने त्यांचे मार्ग वेगळे झाले. (T20 World Cup Final: School Friends Daryl Mitchell and Marcus Stoinis will Face Off As Rivals)

ही गोष्ट 2009 सालची आहे. तेव्हा डॅरेल मिशेल आणि मार्कस स्टॉयनिस एकाच संघासाठी एकत्र खेळायचे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सध्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी त्यांच्यासोबत तीनही स्कारबोरोसाठी प्रथम श्रेणी प्रीमियरचा आनंद लुटला होता. पण आता त्या सेलिब्रेशनच्या एका दशकानंतर तो त्या दोघांना T20 वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी लढताना पाहणार आहे.

लहानपणी एकत्र अनेक किताब पटकावले

मार्कस स्टॉयनिस आणि डॅरेल मिशेल यांनी स्कारबोरोसाठी उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत बॅट आणि बॉलने मॅच-विनिंग कामगिरी केली होती. सेमीफायनलमध्ये स्टॉयनिसने 189 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मिशेलने 26 धावांत 4 बळी घेतले, दोन्ही खेळाडूंनी सामन्यात चमकदार कामगिरी केली, याच्या जोरावर स्कारबोरोने बेझवॉटर-मॉर्लेचा पराभव करून प्रीमियरशिपचे विजेतेपद पटकावले.

आज फायनलचे रस्ते वेगळे

एकेकाळी एकत्र खेळून शालेय संघाला विजय मिळवून देणारे स्टॉयनिस आणि मिशेल आज दोन वेगवेगळ्या संघांसाठी विजयाचे ढोल बडवताना दिसणार आहेत. मिशेल अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघासाठी आपली ताकद दाखवताना दिसणार आहे, तर स्टॉयनिस ऑस्ट्रेलियासाठी अशीच कामगिरी करेल.

डॅरेल मिशेल उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा हिरो ठरला. त्‍याने टूर्नामेंटमध्‍ये 72 धावांची मोठी खेळी खेळली. उपांत्य फेरीपर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये त्याने 197 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या वर आहे. त्याच वेळी, मार्कस स्टॉयनिसने 6 सामन्यांच्या 4 डावात 80 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 40 आहे. फलंदाजीत स्टॉइनिसचा स्ट्राईक रेट 138 च्या आसपास राहिला आहे. एकूणच, 2021 च्या T20 विश्वचषकातील स्टॉइनिसपेक्षा मिशेलची कामगिरी अधिक मजबूत आहे. आता आजच्या फायनलमध्ये कोण कोणावर मात करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर बातम्या

न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मॅच, भारत पाकिस्तानसारखी का होते? काय आहे स्पेशल कारण??

New Zealand VS Australia T20 World Cup Final Live Streaming | टी20 विश्वचषकाचा थरार, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियमध्ये अंतिम सामना; कधी, कुठे पाहाल?

विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी

(T20 World Cup Final: School Friends Daryl Mitchell and Marcus Stoinis will Face Off As Rivals)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.