IND vs PAK : शेवटच्या सहा षटकांत भारतीय गोलंदाज ठरले गेम चेंजर, पाकिस्तानचा होणार विजय भारताने हिसकावला

IND vs PAK Match Highlights: न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ 120 धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवले होते. पाकिस्तानच्या संघाने पाहिल्या 14 षटकांत पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते.

IND vs PAK : शेवटच्या सहा षटकांत भारतीय गोलंदाज ठरले गेम चेंजर, पाकिस्तानचा होणार विजय भारताने हिसकावला
india and pakistan match
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:26 AM

IND vs PAK Match Highlights: भारत आणि पाकिस्तानमधील रविवारी झालेला सामना अनेक अर्थांनी रोमहर्षक राहिला. सामन्या दरम्यान येणारा पाऊस, कमी झालेली धावसंख्या यामुळे सामन्यात रंगत वाढली होती. हा सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. पाकिस्तानच्या बाजूने पूर्ण झुकलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे सामना भारताच्या खात्यात आला.

न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ 120 धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवले होते. पाकिस्तानच्या संघाने पाहिल्या 14 षटकांत पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी कमाल केला अन् पाकिस्तान पराभूत झाला. पाकिस्तान 7 गडी गमावत 113 धावाच करु शकला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताची पाकिस्तानविरोधात 8 सामन्यातील हा 7 सातवा विजय आहे.

हे सुद्धा वाचा

अशी केली भारतीय फलंदाजांनी कामगिरी

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारतीय संघ 119 धावांवर गारद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 14 षटकांत 3 गडी गमावून 80 धावा केल्या होत्या. यामुळे पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर होता. त्यांच्या 7 विकेट बाकी होत्या. विजयासाठी त्यांना 36 चेंडूत फक्त 40 धावा हव्या होत्या.

  1. जसप्रीत बुमराह हा 15 वे षटक टाकण्यासाठी आला. त्यानंतर परिस्थिती बदलली. या षटकात पहिल्याच चेंडूवर 31 धावा केल्यानंतर बुमराह याने सेट फलंदाज मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड केले. या विकेटनंतर पाकिस्तानचा संघ सावरू शकला नाही.
  2. 16 वे षटक स्टार स्पिनर अक्षर पटेलने घेतली. त्याने या षटकांत केवळ 2 धावा दिल्या. त्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढला.
  3. 17वे षटक हार्दिक पांड्याने टाकले आणि त्याने तिसऱ्याच चेंडूवर शादाब खानला बाद केले आणि पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव केला. पंड्याने 1 विकेट घेतली आणि 17 व्या षटकात केवळ 5 धावा दिल्या.
  4. आता पाकिस्तानला शेवटच्या 18 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. मोहम्मद सिराजने 18 वे षटक टाकले, ज्यामध्ये पाकिस्तानने 9 धावा केल्या. त्यामुळे पुन्हा सामना पाकिस्तानच्या ताब्यात आला. त्यांना शेवटच्या 2 षटकात 21 धावांची गरज होती आणि 5 विकेट शिल्लक होत्या.
  5. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा 19 वे षटक टाकले आणि त्याने या षटकात केवळ 3 धावा दिल्या. तसेच इफ्तिखार अहमद याला बाद केले. आता शेवटच्या षटकात पाकिस्तानला 18 धावांची गरज होती.
  6. कर्णधार रोहितने हे शेवटचे षटक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला दिले. त्यावेळी शाहीन आफ्रिदी आणि इमाद वसीम क्रीजवर उपस्थित होते. अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर इमाद याला झेलबाद करून पाकिस्तानची शेवटची आशा संपवली. त्यानंतर आफ्रिदी आणि नसीम शाह या षटकात केवळ 11 धावाच करू शकले आणि पाकिस्तानचा संघ 6 धावांनी पराभूत झाला.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.