T20 WC: दुसऱ्या सराव सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, विराटसेनेसमोर फलंदाजी क्रम ठरवण्याचं आव्हान

टी -20 विश्वचषकासाठी आपली तयारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात उतरेल. भारताला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानशी खेळायचे आहे.

T20 WC: दुसऱ्या सराव सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, विराटसेनेसमोर फलंदाजी क्रम ठरवण्याचं आव्हान
ishan kishan - virat kohli
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 10:42 AM

मुंबई : टी -20 विश्वचषकासाठी आपली तयारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात उतरेल. भारताला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानशी खेळायचे आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची स्पर्धा आहे. हा सराव सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 पासून खेळवला जाईल. (T20 World Cup : India vs Australia warm up match preview)

टीम इंडिया त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीची चाचणी घेईल. विराट ब्रिगेडसमोर दुसऱ्या आणि शेवटच्या सराव सामन्यात फलंदाजी क्रम निश्चित करण्याचे लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्ध सोमवारच्या सराव सामन्याआधी, कोहलीने म्हटले होते की, पहिले तीन क्रमांक निश्चित आहेत, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली तर तो (कोहली) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताला 7 विकेट्स राखून विजय मिळवता आला. या सामन्यात 45 चेंडूत आक्रमक 70 धावांची खेळी करणाऱ्या युवा इशान किशनने प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा दावा सिद्ध केला आहे. ऋषभ पंतला (नाबाद 29) फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादवच्या वरचे स्थान मिळेल.

हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार का?

रोहितने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली नाही, त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळू शकते. हार्दिक पंड्यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वास दिसला नाही. जर तो गोलंदाजी करू शकत नसेल तर भारतीय संघ व्यवस्थापन त्याला केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरवेल का हे पाहावे लागेल. त्याच्या गोलंदाजीशिवाय भारत सहाव्या गोलंदाजाचा पर्याय गमावेल कारण पाच गोलंदाजांपैकी एखादा गोलंदाज अपयशी ठरू शकतो.

बुमराह-शमी फॉर्मात

भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्ध एक विकेट घेतली, पण जसप्रीत बुमराह त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. मोहम्मद शमीने तीन बळी घेतले, पण तो महागडा ठरला. राहुल चहरनेही खूप धावा दिल्या. भारताच्या सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास, टी – 20 विश्वचषक 2016 पासून, भारताने 72 टी -20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 45 जिंकले आहेत.

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया: अॅरोन फिंच (कर्णधार), अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिशेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोयनिस, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा

इतर बातम्या

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(T20 World Cup : India vs Australia warm up match preview)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.