T20 World Cup India vs New Zealand live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना
भारताचा दुसरा टी - 20 विश्वचषकाचा सामना आज न्यूझीलंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. पहिल्या सामन्यातील दारुण पराभवानंतर आज विजयासाठी कोहलीची टोळी मैदानात उतरणार आहे.
दुबई : भारतीय क्रिकेट संघाची टी -20 विश्वचषकाची (T20 World Cuo 2021) सुरुवात अतिशय खराब झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध तब्बल 10 विकेट्सनी गमावल्यानंतर आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघानी पहिला सामना गमावला आहे. भारताच्या दृष्टीने आजच्या सामन्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेमक्या कोणत्या खेळाडूंना आज संधी कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन देणार हे पाहावं लागले. मागील सामन्यात सर्वात मोठी कमतरता असणारा सहावा बोलर आज तरी मिळणार का? हे पाहावं लागेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी – 20 विश्वचषकाचा सामना कधी खेळवला जाईल?
टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा दुसरा सामना आज रविवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना कुठे खेळवला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आजचा टी -20 सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे होईल?
टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
या सामन्यांचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
संभाव्य भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
संभाव्य न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टीम सैफर्ट, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
हे ही वाचा :
(T20 world cup india vs new zealand live streaming when and where to watch online match)