T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे अंतिम 11 खेळाडू जाहीर, मिस्ट्री स्पीनरला मिळाली संधी

भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करत आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे अंतिम 11 खेळाडू जाहीर, मिस्ट्री स्पीनरला मिळाली संधी
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 7:15 PM

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याने भारत यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील  लढाई सुरु करत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधील या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने आधीच अंतिम 12 खेळाडू जाहीर केले असताना आता भारतानेही आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले आहेत.

अनेकांनी या सामन्यात भारताने कोणत्या प्लेईंग इलेव्हनसोबत उतरावं याबाबतचे सल्ले दिले होते. त्यानंतर अखेर आता भारताने आपले अंतिम 11 खेळाडू समोर आले आहेत. यावेळी भारताने 5 गोलंदाज घेतले आहेत. ज्यामध्ये दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाजाना सामिल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात संधी देण्यात आली आहे.

अशी आहे भारताची अंतिम 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा,  भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल

स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी दोन देशांचे चाहते दुबईत दाखल होऊ लागले आहेत.

आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचा बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला दाखल झाला आहे, तर भारतातील टीम इंडियाचा मोठा चाहते सुधीर गौतम देखील दुबईला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(T20 World Cup, India vs Pakistan : Indias final 11 man squad for the match against Pakistan announced)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.