T20 WC, India vs Pakistan : भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा अंतिम 12 जणांचा संघ जाहीर
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
मुंबई : भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. (T20 World Cup, India vs Pakistan : Pakistan’s final 12-man squad for the match against India announced)
अनेकांनी या सामन्यात भारताने कोणत्या प्लेईंग इलेव्हनसोबत उतरावं याबाबतचे सल्ले दिले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. भारताने अद्याप या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने या सामन्यासाठी त्यांच्या अंतिम 12 जणांचा संघ घोषित केला आहे.
पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.
Pakistan’s 12 for their #T20WorldCup opener against India.#WeHaveWeWill pic.twitter.com/vC0czmlGNO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2021
कशी असेल भारताती प्लेईंग XI?
सलामीवीर : संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर असेल.
मधली फळी : तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर अनुक्रमे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची नावे समाविष्ट केली जातील.
खालची फळी (अष्टपैलू-गोलंदाज) : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार
भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल
स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी दोन देशांचे चाहते दुबईत दाखल होऊ लागले आहेत.
आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचा बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला दाखल झाला आहे, तर भारतातील टीम इंडियाचा मोठा चाहते सुधीर गौतम देखील दुबईला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते.
इतर बातम्या
(T20 World Cup, India vs Pakistan : Pakistan’s final 12-man squad for the match against India announced)