‘बदला घेतला’, भारतीय क्रिकेट चाहत्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला खरंच डिवचलं?
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेव्हा पॅव्हेलियनला परततो तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्यांपैकी एक भारतीय क्रिकेट चाहता हा जोरजोरात ओरडत पॅट कमिन्सला डिवचण्याचा प्रयत्न करतो. "पॅट कमिन्स हा 2023 च्या पराभवाचा बदला आहे. आम्ही बदला घेतला आहे, असं बोलताना तो दिसतो.
क्रिकेट प्रेमींना सध्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या सामन्यांचा थरार बघायला मिळतोय. अर्थात वर्ल्ड कपची ही टुर्नामेंट आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता केवळ तीन सामने शिल्लक राहिलेले आहेत. यापैकी दोन सामने हे सेमीफायनचे आणि शेवटचा सामना हा अंतिम सामना असणार आहे. सेमीफायनलचे दोन्ही सामने हे आजच असणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना आज डबल धमाका बघायला मिळणार आहे. पहिला सामना हा गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून सुरु होतोय. हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर दुसरा हा सामना हा आज रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. हा सामना टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे.
या सामन्यांकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. पण या सामन्यांआधी सोशल मीडियावर सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक भारतीय क्रिकेट चाहता ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्सला डिवचताना दिसत आहे. अर्थात या व्हिडीओची ‘टीव्ही9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्यावर्षी वन डे वर्ल्ड कप पार पडला. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सर्व सामने जिंकला होता. टीम इंडियाची ही कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींना खूप आवडली होती. टीम इंडिया वर्ल्ड कप आपल्या खिशात घेईल, असं वाटत होतं. पण अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला. कारण ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला. हा पराभव भारतीयांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. या सामन्याचा वचपा आता टीम इंडियाने घेतल्याचं भारतीय क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे. कारण टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मुकताच टी-ट्वेन्टीमधील सुपर 8 सामन्यांमधला शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धो धो धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्माने तर 42 चेंडूत 92 धावा केल्या. याच संघाचा दिवसाचा स्टेडियममधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट चाहता काय म्हणाला?
संबंधित व्हिडीओ कितपत खरा आहे हे सांगणं कठीण आहे. पण ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेव्हा पॅव्हेलियनला परततो तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्यांपैकी एक भारतीय क्रिकेट चाहता हा जोरजोरात ओरडत पॅट कमिन्सला डिवचण्याचा प्रयत्न करतो. “पॅट कमिन्स हा 2023 च्या पराभवाचा बदला आहे. आम्ही बदला घेतला आहे. अहमदाबाद आठवतो ना. तुम्ही आता उद्या घरी परतणार आहात”, अशा शब्दांत क्रिकेट चाहता पॅट कमिन्सला उद्देशून बोलत होता. याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कितपत खरा आहे, याची पुष्टी आम्ही करत नाहीत. पण संबंधित व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
Captain Rohit Sharma and ICT Fan’s owning Pat Cummins after India win.🤫🔥🇮🇳
“He pat that’s what 2023, that’s a revenge of 2023, remember and the what you going home tomorrow.”
Thank you so much @ImRo45 🐐👏 pic.twitter.com/wA3c09ZDV8
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 24, 2024