T20 World Cup साठी टीम इंडिया जाहीर, जाणून घ्या ‘या’ 5 मोठ्या गोष्टी
T20 World Cup: बीसीसीआयने सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे.
मुंबई: बीसीसीआयने सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. 23 ऑक्टोबरपासून टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध अभियान सुरु करणार आहे. टीम मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांना स्थान मिळालं आहे. या दोघांच्या निवडीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. टीम इंडियाच्या निवडीबद्दल पाच गोष्टी जाणून घ्या.
- रवींद्र जाडेजाची निवड पक्की मानली जात होती. मात्र आशिया कपच्यावेळी त्याला दुखापत झाली. त्यामुळे टीमच संतुलन बिघडलं. जाडेजा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार नाहीय. त्याच्याजागी अक्षर पटेललला संधी मिळाली आहे.
- जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलने टीममध्ये पुनरागमन केलं आहे. दोघेही दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर गेले होते.
- टी 20 वर्ल्डकपसाठी दीपक चाहरला स्टँडबायवर ठेवण्यात आलय. दीपक चाहर दुखापतीमुळे बराचकाळ मैदानाबाहेर होता. आता तो पूर्णपणे फिट झालाय.
- टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंतला संधी मिळेल का? असा प्रश्न विचारला जात होता. बीसीसीआयने दोघांवर विश्वास दाखवून संधी दिली आहे. दोघांना 15 सदस्यीय टीममध्ये स्थान मिळालं आहे.
- आशिया कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीनंतर मोहम्मद शमीला संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण त्याला सुद्धा दीपक चाहर, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई सोबत स्टँडबायवर ठेवलं आहे.